लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना मोदींनी ‘हे’ विधान करताच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जोडले हात!


आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकावला आणि देशाला संबोधित केले. आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला आणि हा काळ पुढील हजार वर्षांचा इतिहास ठरवेल असे सांगितले. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी सर्वोच्च न्यायालयाचाही उल्लेख केला, त्यानंतर समोर बसलेल्या सरन्यायाधीश डीव्ही चंद्रचूड यांनी हात जोडून पंतप्रधान मोदींचे आभार मानले. As soon as Modi mentioned the Supreme Court while addressing the nation from the Red Fort Chief Justice Chandrachud joined his hands

वास्तविक पंतप्रधान मोदी मातृभाषेबद्दल बोलत होते. ते म्हणाले, “आम्ही मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला आहे. मी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचेही आभार मानतो, की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आता ते जे निर्णय देतील त्याचा जो ऑपरेटिव पार्ट असेल, तो ज्या भाषेत न्यायालयात आला आहे त्याच भाषेत उपलब्ध होईल. मोदींच्या या वक्तव्यानंतर समोर बसेलल्या सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हात जोडून नम्रतापूर्वक त्यांना नमस्कार केला.

यावेळी मोदींनी आधुनिकतेबद्दलही सांगितले की, आज देश आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. महामार्ग असो, रेल्वेमार्ग असो, हवाई मार्ग असो, जलमार्ग असो… असे कोणतेही क्षेत्र नाही, ज्यामध्ये देश प्रगतीच्या दिशेने काम करत नाही. गेल्या 9 वर्षात आम्ही आदिवासी भागात आणि डोंगराळ भागात विकासावर खूप भर दिला आहे. पर्वतमाला-भारतमालासारख्या योजनांद्वारे समाजातील त्या घटकाला आम्ही बळ दिले आहे.

As soon as Modi mentioned the Supreme Court while addressing the nation from the Red Fort Chief Justice Chandrachud joined his hands

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात