सध्याच्या राजकारणात पोरखेळ, राज्यात बिग बॉसचा शो सुरू, पंकजा मुंडे यांची टीका


सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते. आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे, असा संताप माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.Children’s play in current politics, Bigg Boss show starts in the state, criticism of Pankaja Munde


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते. आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे, असा संताप माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात सध्या अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नबाब मलिक आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये जोरदार वादंग सुरू आहे. मलिक दररोज काहीतरी आरोप करत आहेत. या सगळ्यामध्ये राज्यातील इतर महत्वाचे विषय मागे पडत आहेत. यावर संताप व्यक्त करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे. हे सर्व महाराष्ट्रात कोण आणते असा प्रश्न विचारला जात नाही. याला आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आहे. 

सरकार पडण्याची विरोधकांनी वाट पाहून नये, तर असे कार्य करावे की ज्या कायार्ची दखल घेऊन जनता आपोआपच सत्ताधाऱ्यांकडे पाठ फिरवून तुम्हाला निवडून आणेल, असा टोल पंकजा मुंडे यांनी लगावला आहे.

Children’s play in current politics, Bigg Boss show starts in the state, criticism of Pankaja Munde

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*