राज्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी ५ लाखांची एफडी, मासिक आर्थिक मदतही मिळणार

children orphaned Due to Covid 19 in maharashtra will get fixed deposit of rs 5 lakh and monthly assistance

children orphaned Due to Covid 19 : कोरोनामुळे ज्यांच्या पालकांपैकी किमान एकाचा मृत्यू झाला आहे अशा अनाथ मुलांच्या नावे पाच लाख रुपयांची एफडी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने बुधवारी जाहीर केला. या मुलांना महिन्याला 1,125 रुपये मदतही देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात अशी 162 मुले आहेत ज्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले आहे आणि त्यापैकी किमान एकाचा साथीच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्यांची देखभाल करण्यासाठी नातेवाईक नसल्याने अशी नऊ मुले सरकारी संस्थांमध्ये राहत आहेत. children orphaned Due to Covid 19 in maharashtra will get fixed deposit of rs 5 lakh and monthly assistance


वृत्तसंस्था

मुंबई : कोरोनामुळे ज्यांच्या पालकांपैकी किमान एकाचा मृत्यू झाला आहे अशा अनाथ मुलांच्या नावे पाच लाख रुपयांची एफडी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने बुधवारी जाहीर केला. या मुलांना महिन्याला 1,125 रुपये मदतही देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात अशी 162 मुले आहेत ज्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले आहे आणि त्यापैकी किमान एकाचा साथीच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्यांची देखभाल करण्यासाठी नातेवाईक नसल्याने अशी नऊ मुले सरकारी संस्थांमध्ये राहत आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, लाभार्थी मुले 21 वर्षे वयाची झाल्यावर त्यांना एफडीची रक्कम व्याजासहित मिळेल. केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या मदतीबरोबरच ही मदतही असेल. मुदत ठेवीची रक्कम ही लाभार्थी बालकाच्या आणि स्थानिक महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त नावे असेल. या योजनेंतर्गत 18 वर्षापर्यंतचे असे कोणतेही बालक लाभार्थी असेल ज्यांचे दोन्ही पालक 1 मार्च 2020 नंतर साथीच्या आजारामुळे मरण पावले आहेत किंवा आईवडिलांपैकी एकाचा मृत्यू कोरोनामुळे आणि दुसऱ्याचा मृत्यू इतर कारणामुळे झाला असेल.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, अनाथ मुलाच्या नातेवाईकांनाही मासिक भत्ता 1,125 रुपये मिळेल. त्या म्हणाल्या, “आम्ही ही रक्कम 2500 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत.” ज्या मुलांच्या आईवडिलांपैकी एकाचे कोरोनामुळे निधन झाले आहे, आणि एक पालक जिवंत आहे, अशी मुलेही मासिक भत्त्यासाठी पात्र असतील. परंतु त्यांना मुदत ठेवीचा लाभ मिळणार नाही. अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात अशी 5172 मुले आहेत ज्यांच्या आईवडिलांपैकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

children orphaned Due to Covid 19 in maharashtra will get fixed deposit of rs 5 lakh and monthly assistance

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात