२५ ऑक्टोबर २०२० रोजी घडली होती घटना, जाणून घ्या काय होती तक्रार
विशेष प्रतिनिधी
पुणे : शहराच्या आसपास अनेक रिसॉर्ट्स आहेत, ज्यामध्ये विविध प्रकारच्या साहसी खेळांची व्यवस्था केलेली असते. याशिवाय, अनेक ठिकाणी तलावही असतात. या रिसॉर्ट्समध्ये सुट्टी घालवण्यासाठी अनेकजण मोठ्यासंख्येने येत असतात. परंतु, रिसॉर्ट्समध्ये जर योग्य येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना केलेल्या नसतील, तर मोठी दुर्घटनाही घडते. याचाच एक उदाहरण समोर आलं आहे. ज्यामुळे संबंधित रिसॉर्टला मोठा आर्थिक दंड बसला आहे.Children drown in Pune resort pool couple gets Rs 1.99 crore compensation
कोची येथील ग्राहक हक्क समितीने पुण्यातील एका रिसॉर्टला सुविधेतील सुरक्षेच्या त्रुटींमुळे आपली दोन मुलं गमावलेल्या दाम्पत्यास १.९९ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील करंदी व्हॅली या साहसी खेळ आणि कृषी पर्यटन रिसॉर्टच्या मालकांविरुद्ध मूळचे अंबलूर येथील रहिवासी असलेल्या पी व्ही प्रकाशन आणि त्यांची पत्नी वनाजा यांच्या तक्रारीशी संबंधी सुनावणी घेतल्यानंतर एर्नाकुलम जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने हा आदेश जारी केला आहे.
दामप्त्यास मिधून प्रकाश(वय -३०) आणि निधीन प्रकाश(वय-२४) ही दोन मुलं होती. ज्यांचा २५ ऑक्टोबर २०२० रोजी संबंधित रिसॉर्टमधील तलावात बुडून मृत्यू झाला होता. मिधून याने घटनेच्या आदल्यादिवशी या रिसॉर्टमध्ये स्वत:साठी, भावासाठी आणि अन्य २२ जणांसाठी रूम बुक केल्या होत्या.
दाम्पत्याने आरोप केला आहे की, संबंधित रिसॉर्ट्सने आपल्या जाहिरातीमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असल्याचे आणि गाइडचीही व्यवस्था असल्याचे नमूद केले होते. मात्र ज्या दिवशी घटना घडली तेव्हा कोणताही गाइड(मार्गदर्शक) उपस्थि नव्हता. सुरक्षा उपाय योजनांच्या अभावामुळे आणि अपुऱ्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे मुलांना गमावावे लागले असल्याचे दाम्पत्याने म्हटले आहे.
याप्रकरणी राजगड पोलिसांनी संबंधि रिसॉर्ट मालकाविरोधात गुन्हा नोंदवला. यानंतर मृत मुलांच्या पालकांनी सुरुवातीस ६ कोटींची मागणी केली होती, परंतु नंतर १.९९ कोटी आणि तक्रारीपासून ते आतापर्यंतच्या दिवसांसाठी१२ टक्के व्याज अशी रक्कम घेतली जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App