विशेष प्रतिनिधी
भोकरदन : मनुष्याच्या आयुष्यात नात्यांना खूप मोठं महत्त्व आहे. जर नातेच नसतील तर आपल्या आयुष्याला अर्थच काय? आपलं आयुष्य आपल्या आयुष्यात असणार्या नात्यांभोवती फिरत असतं. करिअर, पैसा हे सर्व त्यानंतर येतं. आणि जर ही रक्ताची नातीच जर तुमची वैरी बनली तर? अशीच एक घटना भोकरदन शहरामध्ये घडली आहे.
Child marriage: Mother and brother marry 17 year old girl 3 times for money, girl reaches police station while preparing for fourth marriage
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या आईने आणि भावाने तीनवेळा पैशासाठी विवाह लावून दिला. चौथ्या वेळी जेव्हा विवाह करण्याची तयारी त्यांनी चालू केली होती. तेव्हा स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी तिने पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांमध्ये आपल्या आईविरुद्ध भावाविरूध्द आणि तीन पतीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी या सर्व घटनेची शहानिशा करून सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.
भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीचा अंदाजे तीन वर्षांपूर्वी तिच्या आई आणि भावाने शेंदुर्णी येथील एका मुलाशी विवाह लावून दिला होता. हा विवाह त्यांनी पैसे घेऊन लावून दिला होता. तिथे एक महिना राहिल्यानंतर तिच्या भावाने तिला परत आणले. त्यानंतर त्यांनी तालुका वरखेडी येथील एका व्यक्तीकडून पैसे घेतले आणि दुसरा विवाह लावून दिला. तीन महिने तिथे राहिल्यानंतर तिला तेथून देखील परत आणण्यात आले.
बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
त्यानंतर पाच महिन्यांनी पुन्हा तिचा विवाह भोकरदन शहरातीलच एका व्यक्तीला सोबत लावून देण्यात आला. ह्या व्यक्तींसोबत ती औरंगाबाद येथे एक वर्ष राहिली. पतीसोबत वाद झाल्याने पीडित मुलगी आपल्या माहेरी भोकरदन येथे आलेली हाेते. या वेळी पुन्हा त्यांनी चौथ्या लग्नाची तयारी चालू केली होती.
जळगावमधील कोणी पाहुणे तिला बघण्यासाठी येणार होते, हे लक्षात येताच तिने या गोष्टींना विरोध केला. तेव्हा तिच्या भावाने तिला मारहाण केली. लग्न झाले नाही तर तुझ्या जिवाला धोका आहे अशी धमकी देखील दिली. त्यानंतर तिने चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क करून पोलिसांनी भेटून आपली सर्व वस्तुस्थिती सांगितली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आई, दोन भाऊ, तीन पतीसह, 12 नातेवाईकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App