Devendra Fadnavis मुख्यमंत्रिपदावरून राजकीय हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

Devendra Fadnavis

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडूनही फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदास पाठिंबा असल्याची माहिती समोर येत आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार हालाचाली सुरू आहेत. यावरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट आणि शिवसेना शिंदे गटात चर्चा सुरू आहे. अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दर्शवलेला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानतून नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. तर, एका नियोजित कार्यक्रमासाठी त्यांना दिल्लीला जावे लागल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत. मात्र फडणवीस दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत.

Chief Ministers post Devendra Fadnavis leaves for Delhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात