सिंधुताई सपकाळ या देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावून लोकांशी संवाद साधायच्या. अशाच वेगवेगळ्या कार्यक्रमांत बोलत असताना त्यांनी एक खंत अनेकदा व्यक्त केली होती.Chief Minister Uddhav Thackeray will fulfill Sindhutai Sapkal’s wish
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं 4 जानेवारी 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.दरम्यान यावेळी राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री, कलाकार सर्व सामान्य जनता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांना श्रध्दांजली वाहून शोक व्यक्त केला.
सिंधुताई सपकाळ या राज्यासह देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावून लोकांशी संवाद साधायच्या. अशाच वेगवेगळ्या कार्यक्रमांत बोलत असताना त्यांनी एक खंत अनेकदा व्यक्त केली होती.
ती खंत म्हणजे कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात सिंधूताई यांच्यावर आधारित एक धडा आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही. ही खंत एका व्हिडिओमध्ये सिंधुताईंनी व्यक्त केली होती. ती क्लिप आता सर्वत्र व्हायरल होत आहे.
यावेळी त्या म्हणाल्या होत्या की , महाराष्ट्रात मोठ व्हायचं असेल तर त्यासाठी मरावं लागतं आणि मेलेला माणूसच मोठा होतो तो महाराष्ट्र आहे असं मत या व्हिडिओमध्ये व्यक्त केलं आहे. मेल्यानंतर जिथं माणसं मोठी होतात तो महाराष्ट्र आहे हे दु:ख त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं होतं.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीची दखल घेतली असून, तसे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. तसेच एक पत्र शालेय शिक्षण विभागांच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठवले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more