बिल्डर, मंत्री, आमदार कुणीही असो, सोडू नका; पोर्शेप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांचे पोलिसांना निर्देश

विशेष प्रतिनिधी

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी थेट पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करून त्यांना या प्रकरणात कुणी कितीही मोठा व्यक्ती अडकला असेल तरी त्याच्यावर बेधडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणी पुण्याला भेट देण्याचीही शक्यता आहे. Chief Minister Shinde’s directive to the police in the Porsche case

पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघाताप्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे. यात 2 तरुण अभियंत्यांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीसह त्याचे वडील विशाल अग्रवाल व आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचाही समावेश आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप वाढल्याच्या पार्श्वभूमीवर तपासाचा गुंता वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करून त्यांना या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. अल्पवयीन आरोपीच्या वडील व पालकांवर पोर्शे कारच्या ड्रायव्हरवर गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.



कोर्टात केस टिकेल असा तपास करा

यासंबंधीच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी जवळपास 10 मिनिटे चर्चा केली. त्यात त्यांनी या प्रकरणात कुणीही कितीही मोठा आरोपी असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणातील आरोपींची सखोल चौकशी करून या प्रकरणात सहभागी असणाऱ्या शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करा. या प्रकरणी मंत्री, बिल्डर, आमदार कुणीही आडवा आला तरी त्याला सोडू नका. त्यालाही या प्रकरणात आरोपी करा. या प्रकरणाच्या माध्यमातून समाजात चांगला संदेश गेला पाहिजे. सरकार पोलिसांच्या पाठिशी आहे. कोर्टात केस टिकेल अशा पद्धतीने तपास करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी अमितेश कुमार यांना दिले आहेत. विशेषतः मुख्यमंत्री शिंदे या प्रकरणी स्वतः पुण्याच्या दौऱ्यावर जाऊन स्थितीचा आढावा घेणार आहेत.

दुसरीकडे, या प्रकरणात संघटीत गुन्हेगारीचे कलम वाढवता येईल का? यावरही वरिष्ठ पातळीवर विचार सुरू असल्याचीही माहिती आहे. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आमदार सुनील टिंगरे यांची संशयास्पद भूमिका

पोर्शे अपघात झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांना फोन केला होता. त्यानंतर टिंगरे पहाटेच पोलिस ठाण्यात गेले होते. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन करत कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य तपास करा, सरकार तुमच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.

Chief Minister Shinde’s directive to the police in the Porsche case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात