विशेष प्रतिनिधी
महाड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाड येथे ‘महाड चवदार तळे सत्याग्रह – शताब्दी वर्ष अभिवादन सोहळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पा’चे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण केले.Chief Minister lays the foundation stone for water purification of Chavdar Lake and beautification of the area
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, रायगडची भूमी अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा संदेश याच भूमीतून दिला. तर, चवदार तळ्याच्या आंदोलनातून स्वराज्य हे समतेसह असायला हवे, असा ‘समता स्थापनेचा’ संदेश महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला.
#Maharashtra #DevendraFadnavis #DrBabasahebAmbedkar #ChavdarTale pic.twitter.com/Zy6EMLp6FW — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 20, 2026
#Maharashtra #DevendraFadnavis #DrBabasahebAmbedkar #ChavdarTale pic.twitter.com/Zy6EMLp6FW
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 20, 2026
– समतेचा संदेश प्रस्थापित
चवदार तळ्याचा सत्याग्रह हा भारतीय इतिहासातील एक अत्यंत निर्णायक टप्पा ठरला. ऑगस्ट 1923 मध्ये तत्कालीन मुंबई विधान परिषदेने सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यानंतरही समाजातील वंचितांना पाणी घेण्यापासून रोखण्याचे प्रकार सुरूच राहिले. हा अन्याय दूर करण्यासाठी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून प्रदीर्घ लढा दिला. त्यांच्या या संघर्षामुळे केवळ चवदार तळेच नव्हे, तर देशभरातील सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले झाले आणि समतेचा संदेश प्रस्थापित झाला, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
– समता आणि समरसता वर्ष
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, यंदाचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असून, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे 200वे जयंती वर्ष व थोर संत श्री गाडगे महाराज यांचे 150वे जयंती वर्ष आहे. तसेच, आजपासून चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षास सुरुवात होत आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने हे वर्ष ‘समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून तळ्याचे पाणी निर्मळ राहील अशा पद्धतीने विकास केला जाईल.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील ज्या व्यक्तींवर जातीभेदातून अत्याचार झाले आणि ज्यांना प्राण गमवावा लागला, त्यांच्या वारसांना आज थेट शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे सुद्धा वितरित केली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट, मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले, खासदार धैर्यशील पाटील, खासदार सुनील तटकरे, खासदार डॉ. ज्योती वाघमारे, आमदार प्रवीण दरेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App