महाबळेश्वर येथील त्यांच्या दरेगावात शेती कामात रमले
विशेष प्रतिनिधी
सातारा : ‘हे एक झाड आहे याचे माझे नाते, वाऱ्याची एक झुळूक दोघांवरूनी जाते.. मला आवडतो याच्या फुलांचा वास.. वासामधुनी उमटणारे जाणीव ओले भास..’ सुप्रसिद्ध मराठी कवयित्री शांता शेळके यांच्या ओळी माझ्या गावाच्या मातीत रमल्यावर माझ्या ओठी येतात, कारण गावातील मातीचा सुगंध मला शेतीकडे आणि माझ्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गावातील शेतात गेल्यावर भावना व्यक्त केल्या.Chief Minister Eknath Shinde is busy with agricultural work in his Dare village
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘जेंव्हा मी माझ्या गावी येतो तेव्हा तेंव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात. महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावात यात्रेनिमित्त आलो असता पुन्हा एकदा शेती आणि मातीत रमलो. यावेळी शेतीकाम करून एक अलौकिक आनंद मिळाला.’
तसेच, माझ्या दरे या गावी औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा, सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला यांची लागवड मी केली आहे. असंही शिंदे म्हणतात.
याशिवाय ‘शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात. गावाकडची माणसं यांच्याशी असलेले नाते याचे आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते.’ त्यामुळेच या ठिकाणी येऊन शेती केल्यावर एक वेगळाच आनंद मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App