‘’बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक’’ मुख्यमंत्री शिंदेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

‘’जनमताचा मान ठेवणारा निकाल, घराणेशाही विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय’’ अशा  शब्दांत निकालचे वर्णन केले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय अस्थिरता संपून शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाले आहे, इतकेच नाही तर आत्तापर्यंत घटनाबाह्य सरकारचा ठपका लावणाऱ्या उद्धव ठाकरेंना या निकालातून चपराकही बसली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच राजीनामा देऊन पवारांच्या सरकार घालवले हे देखील न्यायालयाच्या आदेशातूनच स्पष्ट झाले आहे. यावरून  आता विविध प्रतिक्रिया उमटत आहते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray after the Supreme Court verdict

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘’’अखेर सत्याचा विजय जनमताचा मान ठेवणारा निकाल. घराणेशाही विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक. मतदार राजाचा सन्मान करणारा निर्णय. शिवसेना वाचविण्यासाठी केलेल्या संघर्षाचा विजय. यापुढे जनमताची फसवणूक करणारे पक्ष सत्तेसाठी आपला आत्मा विकण्याचे धाडस करणार नाही. सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी नितीमत्ता सोडणाऱ्यांनी नितीमत्तेची भाषा करू नये.’’

याचबरोबर ‘’हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी तसेच शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादी होऊ नये म्हणून आम्ही केलेल्या संघर्षाला मिळालेले हे यश असून, आज त्यांच्या आत्म्याला नक्कीच आनंद आणि समाधान वाटले असेल.’’ असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी ट्वीटद्वारे माहिती देताना सांगितले की, ‘’सत्यमेव जयते. अखेर सत्याचा विजय झाला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट केली. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून आमचे सरकार हे कायदेशीर मार्गाने स्थापन झाल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. या निर्णयाचा स्वीकार करतानाच यापुढे अधिक जोमाने सर्वसामान्य माणसासाठी काम करण्याची ग्वाही देखील यावेळी दिली.’’

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray after the Supreme Court verdict

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात