‘’हिंदुत्व, हिंदुत्व करणारे आता सावरकरांचा अपमान करणाऱ्याची खासदारकी वाचवण्यासाठी…’’ एकनाथ शिंदेचा ठाकरे गटाला टोला!

‘’बाळासाहेब ठाकरे जर असते, त्यांनी…’’असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. गुजरातच्या सुरत कोर्टाने गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तेव्हापासून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आहेत. तर आज राहुल गांधींनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, यावरून भाजपा आक्रमक झाली आहे, याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज विधानसभेत संताप व्यक्त केला आहे. तसेच राहुल गांधींचे समर्थन करण्यावरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला आहे. Chief Minister Eknath Shinde criticizes Thackeray group for supporting Rahul Gandhi who insulted Savarkar

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘’हिंदुत्व, हिंदुत्व करणारे आता सावरकरांचा अपमान करणाऱ्याची खासदारकी वाचवण्यासाठी त्यांच्या बाजूने उभा आहेत, हे दुर्भाग्य आहे. बाळासाहेब ठाकरे जर असते, त्यांनी मणीशंकर यांना जसे जोडे मारले होते, तसे यांना मारले असते. हिंदुत्वाचं नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही. आता सावरकरांच्या विषयावर ते दिसून येत आहे. जे सावरकरांचा अपमान करत आहेत, त्याचं पद वाचवण्यासाठी ते त्यांच्यासोबत उभा राहून काळ्या फिती बांधत आहेत. यापेक्षा आणखी दुर्दैवं काय असू शकतं. जे झालं ते कायद्यानुसार, नियमानुसार झालं आहे. न्यायालयाच्य निर्णयानुसार झालं आहे. या अगोदरही असं अनेकांसोबत झालेलं आहे.’’


‘’हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात, लढत राहू’’ राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; भाजपानेही दिलं प्रत्युत्तर


याशिवाय ‘’अशाप्रकारे जर राहुल गांधी बोलत राहिले तर लोक रस्त्यावर उतरतील, त्यांनी रस्त्यावर फिरू देणार नाहीत. शेवटी सावरकर हे स्वातंत्र्यवीर, देशभक्त, त्यांनी अंदमानात काळ्या पाण्याचा तुरुंगवास भोगला, त्यांना कोलूवर जुंपलं गेलं. अशा देशभक्ताला ज्यांचा एवढा मोठा त्याग आहे, त्यांच्यावर हे वारंवार जाणीवपूर्वक बोलणं, हा देशाचा अपमान आहे. समस्त स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे.’’ असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी बोलून दाखवलं.

याचबरोबर ‘’ज्या काँग्रेसने, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. पंतप्रधान मोदींचा चोर म्हणून उल्लेख केला, त्यांना काय वाटतंय आम्ही गोबेल्स नीती प्रमाणे वारंवार आरोप करत राहू म्हणजे लोकांना खरं वाटेल. परंतु मागच्या निवडणुकीत त्यांनी एक मुद्दा काढला होता, चौकीदार चोर है. त्यांना लोकांनी सपाट करून टाकलं. चोर म्हणणाऱ्यांची अवस्था उद्या काँग्रेसची चोराची लंगोटीही राहणार नाही.’’ असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारपरिषदेत केलं.

Chief Minister Eknath Shinde criticizes Thackeray group for supporting Rahul Gandhi who insulted Savarkar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात