मुख्यमंत्री पदावर डोळा ठेवायला वेडा नाही; अजितदादांनी काढली मराठी माध्यमे निर्मित कोल्ड वॉरची हवा!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : मुख्यमंत्री पदावर डोळा ठेवायला मी आणि देवेंद्र फडणवीस काही वेडे नाहीत, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज मराठी माध्यमे निर्मित कोल्ड वॉरची हवा काढून टाकली.chief minister Ajitdada removed the air of cold war produced by Marathi media

पुण्यात चांदणी चौकाच्या उड्डाणपूल उद्घाटन समारंभात बोलताना आणि त्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी मराठी माध्यमांच्या काही बातम्यांवर परखड भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. वार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार केलेली वॉर रूम बाजूला सारून अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर अतिक्रमण केले आहे, असे त्यात नमूद केले होते.



 

मात्र अजित पवारांनी या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या. मुख्यमंत्री पद सध्या रिकामे नाही आणि त्याच्यावर डोळा ठेवायला मी आणि देवेंद्र फडणवीस दोघेही वेडे नाही. आमच्यात कोणतेही कोल्ड वॉर बिलकुल नाही. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या मी नेहमी आढावा बैठका घेतो. पण अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो याची पक्की जाणीव मला आहे. पत्रकारांनी माहितीपूर्ण बातम्या द्यायला हरकत नाही. पण खोट्या बातम्या देऊ नयेत, अशा कानपिचक्या अजित पवारांनी दिल्या.

15 ऑगस्टचे पुणे जिल्ह्यातले झेंडावंदन पालकमंत्री कधीच करत नाहीत. मी अनेक वर्षे पुण्याचा पालकमंत्री होतो. येथे नेहमी राज्यपालच झेंडावंदन करतात. त्यामुळे आमच्या नाराजीचा विशेष उद्भवत नाही, अशा शब्दांत अजितदादांनी मराठी माध्यमांच्या बातम्यांची पोलखोल केली.

chief minister Ajitdada removed the air of cold war produced by Marathi media

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात