विशेष प्रतिनिधी
नाशिक : Chhagan Bhujbal मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे आक्रमक झालेले ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दुबईमध्ये सरत्या वर्षाला गुड बाय करताना नवीन वर्षाचे स्वागत करून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर भुजबळ यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे खाते काढून मला मंत्रिपद नको अशी स्पष्ट भूमिका मांडतानाच ‘तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे’ हा संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत वेट अँड वॉच करण्याचे संकेत दिले.Chhagan Bhujbal
ओबीसी आरक्षणासाठी लढा देण्याबरोबरच राज्य सरकारसाठी संकटमोचक पदाची भूमिका बजावल्यानंतर भुजबळ यांना महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये चांगले खाते मिळेल अशी अपेक्षा समर्थकांना वाटत होती. प्रत्यक्षात त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून केंद्र सरकारमध्ये पाठवण्याचा निर्णय झाल्याचा आश्चर्याचा धक्का देत मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आले. त्यामुळे भुजबळ कमालीचे संतप्त झाले होते. त्यांनी अजित पवार यांना चांगलेच बोल सुनावत ‘जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना’ असे सांगत राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत दिले होते. भुजबळांसारखा महत्त्वाचा नेता महायुतीपासून दूर झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीचा सामना करावा लागू शकतो हे लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केली. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर भुजबळ परदेश दौऱ्यावर गेले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App