Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंची भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शेवटची वॉर्निंग; पण अजितदादांच्या नेत्यांना कोण गप्प करणार??

Chandrashekhar bawankule

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना-भाजप महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सामावून घेण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे त्यामुळे महायुतीतल्या कुठल्याच घटक पक्षांबद्दल किंवा नेत्यांबद्दल कोणीही चुकीचे बोलता कामा नये या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शेवटची वॉर्निंग दिली. Chandrashekhar bawankule issues final warning to BJP leaders

महायुती भाजपच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांनी स्वीकारली आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि पंतप्रधान मोदींबरोबर काम करण्यासाठी महायुती झाली आहे. ती सर्व स्तरांमधल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्वीकारावीच लागेल, अशी तंबी बावनकुळे यांनी दिली.

बावनकुळे यांनी भाजप सारख्या शिस्तबद्ध पक्षात थंबी दिल्याने ती तंबी खालच्या स्तरापर्यंत जाण्याची ही दाट शक्यता आहे. पण त्या पलीकडे जाऊन अजित पवारांची राष्ट्रवादीची डबल गेम खेळते आणि अजितदादांचे चेले थेट देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देतात, त्यांना कसे रोखणार??, हा सवाल तयार झाला आहे.


Prabhakar Mande : पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्याचा जागर; पुनरूत्थान समरसता गुरुकुलममध्ये अभ्यास संगितीचे आयोजन!!


अजित पवारांना महायुतीमध्ये घेऊन भाजपने असंगाशी संग केला. त्यामुळे भाजपचे नुकसान झाले, असे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केले होते. अजित पवारांच्या महायुतीतल्या सामीलीकरणामुळे भाजपला लोकसभेत पाच-सहा जागांचा फटका बसला विधानसभेतही 40 जागांचे नुकसान होत आहे, असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातले महत्त्वाचे नेते समरजित घाडगे भाजपला सोडून गेले. अजित पवारांबरोबर युती केल्यामुळे भाजपचे 24 नेते नाराज असल्याची कबुली खुद्द बावनकुळे यांनी दिली होती. मात्र, त्यानंतरच बावनकुळे यांनी भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महायुतीतल्या कुठल्याही नेत्याबद्दल चुकीचे बोलू नका, अशी फायनल वॉर्निंग दिली.

अजितदादांची डबल गेम

भाजपच्या नेत्यांना बावनकुळेंनी फायनल वॉर्निंग दिली असली, तरी खुद्द अजित पवारच महायुतीत डबल गेम खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पोस्टर्स अजितदादांच्या राष्ट्रवादीत मुख्यमंत्र्यांचे नाव गायब करून लावली. सगळे श्रेय गुलाबी जॅकेट घातलेल्या अजितदादांना मिळावे असेच प्रयत्न सुरू झाले. इतकेच नाहीतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींसारखे नेते थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विषयांवर आव्हान देते झाले. रोजच्या रोज अजितदादांच्या पक्षांचे प्रवक्ते वेगवेगळी वक्तव्ये करून भाजपला कोंडीत पकडण्याचा आणि महाविकास आघाडीला बळ देणारा अजेंडा राबवत राहिले. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीला महायुतीत कोण तंबी देणार आणि कसे रोखणार??, हा सवाल तयार झाला.

Chandrashekhar bawankule issues final warning to BJP leaders

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात