विशेष प्रतिनिधी
पुणे : लोकसभा निवडणुकीत महायुती वर मात केल्यानंतर महाविकास आघाडी मधले घटक पक्ष कितीही अपबीट मूड मध्ये असले तरी त्यांच्यातली आपापसातली स्पर्धा मात्र तीव्र झाली आहे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता ताब्यात येण्याची शक्यता निर्माण होताच त्या सत्तेतला आपला सर्वाधिक वाटा सुनिश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीतले घटक पक्ष एकमेकांवरच कुरघोडी करायला लागले आहेत. याचे अत्यंत पुण्यातल्या काँग्रेसच्या बैठकीत आले.
एकीकडे शरद पवार कोल्हापूर आणि सोलापूर या दक्षिण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये राजकीय मुशाफिरी करत असताना दुसरीकडे काँग्रेस पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातच त्यांच्या पक्षात सेंधमारी करण्यात गुंतली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पडण्याचा फायदा काँग्रेससाठी जास्तीत जास्त करून घ्या, असा कानमंत्र नाना पटोले यांनी पुण्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला त्याबरोबर पुण्यातल्या काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीकडचे हडपसर आणि पर्वती हे दोन मतदारसंघ काँग्रेससाठी खेचून घेण्याची तयारी चालवली.
Prabhakar Mande : पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्याचा जागर; पुनरूत्थान समरसता गुरुकुलममध्ये अभ्यास संगितीचे आयोजन!!
पवारांनी कोल्हापूर जिल्ह्यात भाजपमधून समरजीत सिंग घाटगे यांना राष्ट्रवादीत घेतले. अजितदादांची राष्ट्रवादी फोडली. सोलापूर जिल्ह्यातही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुरुंग लावला, पण दुसरीकडे पवारांना पुण्यातले दोन मतदारसंघ गमवायची वेळ काँग्रेसने आणली. महाविकास आघाडीत काँग्रेसचा आत्मविश्वास सर्वाधिक दुनावण्याचा परिणाम घडला.
महाविकासाठी मुख्यमंत्रीपदासाठी संख्याबळाचा मुद्दा काँग्रेसने लावून धरला त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले बाळासाहेब थोरात वगैरे नेते आक्रमक राहिले त्यामुळे पवारांना संख्याबळाचा मुद्दा मान्य करावा लागला उद्धव ठाकरेंना आणि खुद्द आपल्या मनातल्या पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांना मागे ढकलावे लागले. त्या पाठोपाठ आपल्या पुण्यातल्या बालेकिल्ल्याचे दोन मतदारसंघ काँग्रेसला सरेंडर करण्याची वेळ पवारांवर आली. काँग्रेसची ही रणनीती यशस्वी होण्याकडे वाटचाल सुरू झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more