विधान परिषद सभापतिपदासाठी भाजप ठाम, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत; मुंबईत आज भाजपा कोअर ग्रुपची बैठक

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधान परिषदेत भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा, असा आग्रह भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा असून, यासाठी महायुतीतील 11 घटक पक्षांची चर्चा करावी लागेल, सर्वांशी चर्चा करून एकत्रित निर्णय करू, असे ते म्हणाले. नागपूर येथे ते वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींची संवाद साधत होते.Chandrasekhar Bawankule votes for BJP’s candidacy for Legislative Council Chairmanship; BJP core group meeting in Mumbai today

शुक्रवारी व्हायरल झालेल्या लेटरहेडवरील पत्राबाबत बावनकुळे म्हणाले की, भाजपा कोअर समितीच्या बैठकीत वीसहून अधिक नावांवरती चर्चा झाली आहे. कुणीतरी खोडसाळपणा केला आहे. ते पत्र नाहीच; ते एक फक्त पान आहे. कुणीतरी त्यावर ठप्पा मारला आहे. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही. त्यात कुठलाही प्रोटोकॉल नाही. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड विधानपरिषदेसाठी चांगले उमेदवार देईल. महाराष्ट्राच्या विकासाकरिता चांगली नावे महाराष्ट्र विधान परिषदेत दिसतील. निवडणुकीसाठी काही लोकांना अंदाज बांधतात त्यातून याद्या तयार होतात असा टोलाही त्यांनी लगावला. नावे जरी मेरिटवर असली तरी त्या लिस्टचा आधार काहीच नाही.



आज महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव व अश्विनी वैष्णव कोअर ग्रुपची बैठक घेणार आहेत, त्यानंतर निवडणूक व्यवस्थापन समिती बैठक असून महाराष्ट्राच्या निवडणुकीत समोर कसे जायचे यावर चर्चा होईल.

14 तारखेला पुणे येथे राज्याची विस्तृत कार्यकारणी बैठक होईल. त्यात राज्यातील साडेचार हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.

ठाकरेंना बजेटचा अभ्यास शिकावा

मुख्यमंत्री असताना बजेट समजत नाही असे म्हणणारे उद्धव ठाकरे आता बजेटवर बोलू लागले आहेत. त्यांना बजेट मतितार्थ समजला असता तर त्यांनी बजेटवर अभ्यास करून प्रतिक्रिया दिली असती. चांगल्या बजेटला, कर्तव्यनिष्ठ सरकारला किंवा टोमणे मारायचे व विरोधासाठी विरोध करायचा. उद्धव ठाकरे यांना बजेटचा अभ्यास करणे शिकावे लागेल. महाराष्ट्रातील जनतेच्या विकासाकरिता महायुती सरकार काम करीत आहे.

Chandrasekhar Bawankule votes for BJP’s candidacy for Legislative Council Chairmanship; BJP core group meeting in Mumbai today

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात