विशेष प्रतिनिधी
पुणे : तुम्ही मुख्यमंत्री होते तेंव्हा हिंगणघाट, भोपर, साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.घडले. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट,” अशी गत उद्धव ठाकरे यांची झाली आहे. कोलकत्ता, हाथरस, उनाव येथील घटनांवर तुम्ही बोलता. Chandrasekhar Bawankule attack on uddhav thackeray
तुम्ही ज्यांच्या मांडीवर बसून नैतिकतेच्या गप्पा करता, बदलापूरच्या घटनेआडून राजकारण करता त्या काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात कित्ती भयंकर घडले होते. तेही कारनामे जरा आठवा. जनतेला ऐकवा, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबाेल केला आहे. बदलापूर येथे विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणावरून उध्दव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.
MVA : महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या जागा वाटपात ठाकरे आणि काँग्रेस तोट्यात; पण पवारांची राष्ट्रवादी ना फायद्यात, ना तोट्यात!!
राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही आठवा. जनतेला कळू द्या. आपले झाकून ठेवून कित्ती दिवस जनतेची दिशाभूल करणार उद्धवजी..!बावकुळे यांनी उध्दव ठाकरे यांच्या काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या प्रकरणांची यादीत दिली आहे. ते म्हणाले, २२ ऑगस्ट २०१३ रोजी, म्हणजे ११ वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी मुंबईतील शक्ती मिलमध्ये प्रेस फोटोग्राफर असलेल्या २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता.
तेंव्हा सरकार काँग्रेस -राष्ट्रवादीचे होते. हिंगणघाटमध्ये भर रस्त्यात तरुण प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळले होते. तेव्हा तर उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होते आणि वसुली सम्राट गृहमंत्री होते. डोंबिवलीच्या भोपरमध्ये १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. ३३ आरोपींची नावं समोर आली होती.तेंव्हाही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि, वसुलीसम्राट गृहमंत्री होते..!
मुंबईतील साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.. येथील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला होता.तेंव्हाही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि, वसुलीसम्राट गृहमंत्री होते.. सर्वच घटनांचा आम्ही निषेध करतो, आरोपीना कडक शिक्षा व्हावी, यासाठी पुढाकार घेतो. पण तुम्ही ‘उठता बसता’ राजकारण करता.उद्धवजी, हे निषेधार्ह आहे. तुमचा दुतोंडीपणा जनता ओळखून आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App