वृत्तसंस्था
मुंबई : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई त्यांच्या आत्महत्या प्रकरणी एडलवाईज कंपनीसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या एनडी स्टुडिओत अंत्यसंस्कार करण्यात आले. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातले अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते.Case filed against 5 people including Edelweiss company in Nitin Desai death case
दरम्यान नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा नितीन देसाई यांनी खालापूर पोलीस स्थानकात लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ECL फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी असे एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन देसाईंच्या पत्नीची तक्रार
2 ऑगस्टला कलादिग्दर्शक आणि कर्जतमधल्या एनडी फिल्म स्टुडिओचे मालक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी 4 ऑगस्टला नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी लेखी तक्रार दाखल केली. ECL फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे प्रमुख रसेश शाह यांच्यासह अधिकाऱ्यांनी कर्ज प्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला. या मानसिक त्रासाला कंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली, असे या तक्रारीत म्हटले होते.
या तक्रारीच्या आधारे खालापूर पोलीस स्थानकात ECL फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी असे एकूण 5 जणांविरोधात कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन देसाईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईच्या पार्थिावावर एनडी स्टुडिओत अंत्यसंस्कार करण्यात आले. जोधा अकबरच्या सेट जवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. नितीन देसाईंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनडी स्टुडिओमध्ये ठेवण्यात आला होता. याठिकाणी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नातेवाईक आणि चाहत्यांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली. अभिनेता अमिर खानसह दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांच्यासह अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
11 ऑडिओ क्लिप
नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी 11 ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या होत्या. त्या पोलिसांच्या हाती लागल्या असून त्या ऑडिओ क्लिपमधून आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल, असा अंदाज आहे. एनडी स्टुडिओचा ताबा कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडं जाऊ नये. त्याऐवजी राज्य सरकारने एनडी स्टुडिओ ताब्यात घ्यावा आणि नव्या कलावंतांना भव्य कलामंच उपलब्ध करून द्यावा, असा उल्लेखही त्या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचे समजते. देसाईंच्या डोक्यावर तब्बल 250 कोटी रुपयांचे कर्ज होते आणि एनडी स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार होती, अशी माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App