विशेष प्रतिनिधी
मुंबई: आगामी काळात पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक रेल्वे किंवा त्या विमानातून करु, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.Cabinet meeting to be held at Deccan Odyssey
ठाकरे म्हणाले, “पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा लवकर सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक त्या रेल्वे किंवा विमानात घेऊ. पण प्रवासाच्या काळात आपल्याला बैठक संपवावी लागेल. कारण आता जग वेगवान आहे. आपण तिथं पोहचून परतीचा प्रवास सुरू झाला तरी आपली कॅबिनेट संपली नाही तर पंचायत होईल, अशी टिपण्णीही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रातील लेण्यांवर अधिक भर दिला. ते म्हणाले, “देशभरात जेवढ्या लेण्या आहेत त्यातील सर्वाधिक म्हणजे 1200 पैकी 800 लेणी महाराष्ट्रात आहेत. यातील 90 टक्के लेण्या अजूनही आपल्याला माहिती नाही.
हजारो वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने लेणी कोरल्या तशा आज निर्माण करता येतील का? आपणही एक आजच्या युगातील लेणी तयार केली पाहिजे. केवळ जुनं जतन करणं नाही तर नवंही तयार केलं पाहिजे. बार्सिलोनामध्ये पुरातन काळापासून निर्माण केलं जाणारं चर्च आहे. त्यात सुरुवातीपासून आजपर्यंतच्या शैलीचं काम पाहायला मिळतं.”
“महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक पर्यटकाला उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी पर्यटन विभागाने प्रयत्न करावेत. पर्यटकच आपले ब्रँड अम्बॅसिडर झाले पाहिजेत, दुसऱ्याची गरज पडायला नको,” अशी सूचना त्यांनी पर्यटन विभागाला केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App