‘त्या’ शेतकऱ्यांना ‘SDRF’ निकषाबाहेर जाऊन मदत देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय


विशेषतः विदर्भ-मराठवाड्यात या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय :

-मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकृत.
– कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू
– मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग इम्पेरिकल डेटा गोळा करणार
– न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड, न्या संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणांत शासनाला मार्गदर्शन करणार
-नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यादेत मदत करणार.
-चेंबूरला अनुसूचित जातीच्या मुला मुलींसाठी आयटीआय
-नांदगाव येथील पीएम मित्रा पार्क उभारणीसाठी मुद्रांक नोंदणी शुल्क १०० टक्के सूट
-चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग येणार. कायद्यात सुधारणा करणार

याशिवाय, ”जून ते ऑक्टोबर 2023 या काळातील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एसडीआरएफ निकषाबाहेर जाऊन मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला, याचा मला अतिशय आनंद आहे. एकूण 2 निर्णय आज घेण्यात आले. पहिला – नुकसानभरपाई 2 हेक्टर मर्यादेऐवजी 3 हेक्टरपर्यंत दिली जाईल आणि दुसरा – शेतजमीन नुकसानीसाठी सुद्धा निकषात बदल करण्यात आला असून 2 हेक्टरच्या मर्यादेत अल्पभूधारक शेतकऱ्यांप्रमाणे अल्पभूधारक नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ दिला जाईल. या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. विशेषतः विदर्भ-मराठवाड्यात या निर्णयाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होईल.” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

Cabinet meeting decided to provide assistance to farmers beyond SDRF criteria

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात