Cabinet expansion : राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर; अजित पवारांकडे अर्थ आणि नियोजन विभागाची जबाबदारी!


जाणून घ्या, नेमकं कोणला कोणत्या खात्याची जबाबदारी दिली गेली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र सरकारचं मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर आज जाहीर झालं. मागील काही दिवसांमधील नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर हे खातेवाटप जाहीर झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांच्या रुपाने राष्ट्रवादीचा गट सामील झाल्याने, या खातेवाटपाकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यात अजित पवारांकडे अर्थ खातं दिलं जाणार असल्याच्या चर्चा अगोदरपासून सुरू होत्या. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थ व नियोजन विभागाची जबाबदारी दिली गेली आहे. Cabinet expansion announced by Maharashtra government Ajit Pawar has the responsibility of finance and planning department

याशिवाय अजित पवारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झालेल्यांमध्ये छगन भुजबळ – अन्न आणि नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील – सहकार, धनंजय मुंडे – कृषी, आदिती तटकरे – महिला व बालविकास मंत्रालय, हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण, संजय बनसोडे – क्रीडा, अनिल पाटील – मदत पुनर्वसन, धर्मरावबाबा आत्राम – अन्न व औषध पुरवठा अशी खाती देण्यात आली आहेत.

या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपासाठी शिंदे गटाकडील कृषी, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही तीन खाती दिली गेली आहेत. तर, भाजपाकडील अर्थ, सहकार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा, महिला आणि बालकल्याण, अन्न नागरी पुरवठा ही सहा खाती देण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असणार आहेत. तर, उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती राहणार आहेत.

शिवसेना (शिंदे गट) – भाजपाच्या मंत्र्यांकडे असणारे खाते –

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

Cabinet expansion announced by Maharashtra government Ajit Pawar has the responsibility of finance and planning department

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात