राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
प्रतिनिधी
मुंबई : शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर झाले असून अजित पवारांकडे फक्त अर्थ आणि नियोजन या दोन खात्यांची जबाबदारी आली आहे, तर मराठी माध्यमांमधल्या पवारनिष्ठ बातम्यांनुसार त्यांच्याकडे महसूल जलसंपदा गृहनिर्माण अशी कोणतीही खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना गेलेली नाहीत. महसूल मंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कायम राहिले असून जलसंपदा खाते स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे, तर गृहनिर्माण खाते भाजपच्याच अतुल सावे यांच्याकडे कायम राहिले आहे. Ajitdada Finance Minister, but the water resources account is with the Fadnavis, while the revenue account is with the Vikhs
मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाची यादी राज्यपालांकडे गेल्यानंतर अजित पवारांनी तीन पक्षांचे मंत्रिमंडळ असल्याने आपण तडजोड स्वीकारल्याचे सूचक वक्तव्य केले होते त्यानुसार अर्थ आणि नियोजन या दोनच खात्यांवर अजित पवारांना चळवळ करावी लागल्याचे स्पष्ट झाले आहे कारण महसूल जलसंपदा गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती भाजपच्याच मंत्र्यांकडे कायम राहिली आहेत. सहकार खाते दिलीप वळसे पाटलांकडे गेले आहे.
याचा अर्थ तडजोडी मध्ये अर्थ – नियोजन आणि सहकार दोनच मलईदार खाती अजित पवारांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वाट्याला आल्याचे मानले गेले पाहिजे.
याचा दुसरा अर्थ असा आहे की अजितदादा शिंदे – फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असले तरी ते तिसऱ्या क्रमांकाचे मंत्री झाले आहेत.
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन हे खाते राहील.
इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more