विशेष प्रतिनिधी
मुंबई : सी व्होटरने घेतलेल्या देशव्यापी सर्व्हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडीला काही जागा गमवून स्पष्ट बहुमत मिळेल, असे दाखविले असले तरी महाराष्ट्रात मात्र बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीला मोठा फटका बसण्याचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. त्याच वेळी ठाकरे – पवारांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला लोकसभेच्या 48 पैकी 34 जागा मिळणार असल्याचे दाखविले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात एकदम आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एक प्रकारे या सर्व्हेमुळे महाविकास आघाडीच्या दंडात यशाच्या बेटकुळ्या फुगल्या आहेत. पण या सर्व्हेतून निदान महाराष्ट्राच्या बाबतीत उभे राहिलेले प्रश्न मात्र काही वेगळेच आहेत. C voter Survey; positive results for MVA in maharashtra, but will MVA remain intact till 2024 loksabha Elections??, that’s the question!!
सर्व्हेतला नेमका दोष काय??
एकतर या सर्व्हेचा कालावधी लक्षात घेतला, तर तो वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीच्या पूर्वीचा सर्व्हे आहे. म्हणजे सर्व्हेचे टाइमिंग चुकले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीची एंट्री होईल का नाही??, याचा त्या सर्व्हेत उल्लेखही नाही. शिवाय वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती झाल्यानंतर शिवसेना महाविकास आघाडी बरोबर पूर्वीच्या एकजिनसीपणाने राहील का नाही??, याचा मागमूसही सर्व्हेच्या प्रक्रियेतच नव्हता, त्यामुळे तो निष्कर्षातही आलेला नाही.
योगी आदित्यनाथच पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, आइएएनएस-सीवोटरच्या सर्व्हेत ५२ टक्के लोकांनी विश्वास केला व्यक्त
राजकीय मेख
याचा अर्थ सी वोटरचा सर्व्हे मूळातच महाराष्ट्रातील वास्तव राजकीय परिस्थिती लक्षात घेण्यापूर्वीचा असून त्याचा निष्कर्षही महाविकास आघाडी एकत्र अथवा एकजिनसी राहील, या शंकास्पद गृहीतकावर आधारलेला आहे आणि नेमकी इथेच या सर्व्हेतल्या दोषाची “राजकीय मेख” आहे.
आघाडीतच मूळात बिघाडी
वंचित बहुजन आघाडीच्या शिवसेनेबरोबरच्या युतीमुळे जिथे महाविकास आघाडीतच बिघाडी झाल्यात जमा आहे, तिथे महाविकास आघाडी एकत्रपणे निवडणूक एकत्र लढविण्याचे गृहीत धरून सर्व्हेचा निष्कर्ष बरोबर असल्याचे सांगताच कसे येऊ शकते??, हा प्रश्न आहे. म्हणजे जिथे मुळात मुद्दलातच खोट आहे, तिथे मुद्दलाच्या चढ्या व्याजावरचे भाकीत करण्यासारखे हे झाले आहे!!
देशाचे जनमत मोदी सरकारला अनुकूलच
सर्व्हेच्या निष्कर्षावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या परस्परविरोधी प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. तशा त्या आल्याही आहेत. त्यात काहीच गैर नाही. पण शरद पवारांनी याच सर्व्हेचा आधार घेऊन देशातले जनमत केंद्र सरकार विरोधात असल्याचा जो निष्कर्ष काढला आहे, तो मात्र वास्तवाशी पूर्ण विसंगत आहे.
विसंगत टिपण्णी
कारण फक्त सर्व्हेचा महाराष्ट्रातलाच आकडा फक्त महाविकास आघाडीच्या बाजूचा म्हणजे 34 आहे. 34 जागा महाविकास आघाडीला मिळतील असे सर्व्हेच्या आधारे गृहीत धरून महाराष्ट्रातले वातावरण केंद्रातल्या मोदी सरकारवर विरुद्ध आहे असे म्हणणे संयुक्तिक आहे. पण संपूर्ण देशात मात्र मोदी सरकारच्या बाजूने 298 जागांचा कौल मिळालेला असताना देशभरात मोदी सरकार विरुद्धचे वातावरण आहे असे म्हणणे पूर्णपणे विसंगत आहे.
पण एकूण सी व्होटरच्या सर्व्हेतून महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या दंडात बेटकुळ्या जरूर फुगल्या आहेत, पण वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीमुळे महाविकास आघाडीचा “अखंड पैलवान” लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरू शकेल का??, हा मूलभूत प्रश्न आहे!!
“लोकसभा निवडणुकीला अजून दीड वर्ष अवकाश आहे. तोपर्यंत आम्ही काम करत राहू. विरोधकांना सर्व्हेचा आनंद घेऊ द्या” : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे “सर्व्हेचा देशातला निष्कर्ष मोदी समर्थकांना हवा आहे, पण महाराष्ट्रातले आकडे सत्ताधाऱ्यांना नको आहेत. आघाडीला 34 नव्हे, 40 जागा मिळतील” : संजय राऊत “सर्व्हेचे निष्कर्ष सत्ताधाऱ्यांना अनुकूल नाहीत. अनेक राज्यांमध्ये ते मागे आहेत. त्यांना बहुमताचा आकडा गाठणे कठीण आहे” : शरद पवार
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App