विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : बिटकॉईनमध्ये केलेल्या गुंतवणुकीत मोठा फायदा असल्याचे आमिष दाखवून कोल्हापूरच्या एका तरुणाला सहा जणांनी १६ लाखांना फसविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. By showing the lure of investing in Bitcoin 16 lakh cheated from Kolhapur youth
हिरेन पाटील (रा. अमरावती), मोहमद हबीब मोहमद हनीफ, मोहमदी बेगम जुनैदी (दोघंही रा. गुलबर्गा), मोहमद आब्बास मोहमद युसुफ, हरजैत कौर ऊर्फ जोया युसूफ फारूकी (दोघे रा. अहमदगड, पंजाब), राकेश कुमार शीमंगलरामजी (रा. नई आबादी, मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील प्रवीण प्रकाश माळी (३५) यांनी फिर्याद दाखल केली.
आरोपींनी कोल्हापुरातील हॉटेलमध्ये लोकांना बक्कळ कमाईचं आमिष दाखवलं होते. बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून आरोपींनी अनेकांना जाळ्यात ओढले. फिर्यादी माळी यांच्याकडून रोख आणि बँक खात्याद्वारे १६ लाख १६ हजार रुपये घेतले होते. नंतर रक्कम घेतल्यानंतर आश्वासनाची पूर्तता केली नाही. गुंतवणुकीसाठी वापरलेली वेबसाईट अचानक बंद केली. मुद्दलही परत न करता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार जानेवारी २०२१ ते आजपर्यंत घडला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App