प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गोरेगाव मधला मेळाव्यात खासदार गजानन किर्तीकर यांनी जाहीरपणे समेटाची भाषा केली. एकनाथ शिंदे गटाशी भांडण वाढवण्याऐवजी समिट करावा, असा सल्ला त्यांनी जाहीरपणे दिला. पण उद्धव ठाकरे यांचे भाषण पाहता त्यांनी हा सल्ला न स्वीकारता उलट शिंदे गटावर चौफेर हल्ला चढवल्याचे दिसले. But Uddhav Thackeray stormed the Shinde group
महाराष्ट्रात सध्या बाप पळवणाऱ्यांची अवलाद फिरते आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर घणाघाती हल्ला चढवला. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मातोश्री बाहेर पडून शिवसेनेच्या गट प्रमुखांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानावर घेतला. यावेळी त्यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचे सांगताना त्यांनी शिंदे गटावर देखील टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटाचा उल्लेख “मिंधे गट” असा करत बाप पळवणारी टोळी अशी अप्रत्यक्ष टीका शिंदे गटावर त्यांनी केली आहे.
या गट प्रमुख मेळाव्याला इतका प्रतिसाद मिळतोय तर मग दसरा मेळाव्यासाठी किती पटीने असेल हे लक्षात येतंय. दसरा मेळावा शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे शिवतीर्थावर होणार आत काही शंका नाही, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
“मिंधे गट” ते बाप पळवणारी अलवाद
संजय राऊत यांच्यासाठी या मेळाव्यात खुर्ची राखीव ठेवली होती. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी खुलासा केला. संजय राऊत हे मोडेन पण वाकणार नाही म्हणत एकट्याने तलवार घेऊन ईडीच्या कारवाई विरोधात लढत आहेत. ते मिंधे गटात गेलेले नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंचावर माझे वडील आहेत की नाही हे पाहिले. कारण मुलं पळवणारी टोळी पाहिली आहे पण सध्या बाप पळवणारी अवलाद महाराष्ट्रामध्ये फिरतेय, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
लीलाधर डाकेही उपस्थित
या मेळाव्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर आणि माजी मंत्री बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू नेते लीलाधर डाके हे उपस्थित होते. लीलाधर डाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन आवर्जून भेट घेतली होती. कीर्तीकर यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाशी भांडण वाढविण्या ऐवजी समेट करावा, असा सल्ला दिला. मात्र, उद्धव ठाकरे यांचे भाषण पाहता हा सल्ला उद्धव ठाकरेंनी ऐकला नाही. उलट शिंदे गटावर तुफानी हल्ला चढविल्याचेच दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App