Buldhana Bus Accident : बसचालक दानिश शेख विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; गाडी ओव्हरस्पीड, तरी चालकाला डुलकी!!

प्रतिनिधी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील बुलढाणा बस अपघात प्रकरणात वाहन चालक आणि पोलीस आरटीओ यांच्या वक्तव्यांमध्ये भिन्नता आढळल्यानंतर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी आणि तपास केल्यावर वाहनचालक दानिश शेख इस्माईल शेखला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. टायर फुटून अपघात झाल्याचा दावा दानिशने केला होता. तो तपासणीत खोटा ठरला आहे. प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा जास्त वेगात गाडी होती आणि चालकाला डुलकी लागली, ही कारणे समोर आली आहेत.Buldhana Bus Accident: Case of culpable homicide against bus driver Danish Sheikh



खाजगी बसच्या अपघाताची आरटीओ विभागाने केलेल्या चौकशीत काही धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.

अपघात टायर फुटून झाला नसून ही बस दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला.

गाडीचा वेग जास्त असल्याने दुभाजकला गाडी घासली. त्यात बसच्या समोरचा एक्सेल तुटल्याने बस उलटली.

त्यामुळे डिझेल टँक फुटल्याने घर्षण होऊन आग लागली.

समृध्दी महामार्गावर मोठ्या वाहनांनी तिसऱ्या लेन मधून जाणे अपेक्षित असतानाही बस रस्ता दुभाजकावर आदळली. याचा अर्थ चालकाने नियमांचे उल्लंघन केले होते, असे परखड निरीक्षण नागपूर ग्रामीण आरटीओचे निरीक्षक राहुल धकाते यांनी नोंदविले.

सोबतच वाहकांची ब्रेथ अनालयझरने तपासणी करणे आवश्यक असून त्याची अंमलबजावणी केली जात असून वाहक नशेत असेल तर अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे ब्रॅथ अनालयझार तपासणी करणे गरजेचे असल्याचे देखील धकाते यांनी सांगितले.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

आरटीओच्या प्राथमिक अहवाल आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहन चालक दानिश इस्माईल शेख याला अटक केली. वाहनचालक दानिश शेखवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी 304, मोटर व्हेईकल ऍक्ट 134, 184, 279 अन्वये गुन्हाही दाखल केला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून 25 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका वाहन चालकावर ठेवला आहे.

“समृद्धी”वरील सर्वात भीषण अपघात

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंतचा सर्वात भीषण अपघात आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची खाजगी बस नागपूर वरून 30 प्रवासी घेऊन पुण्याकडे जात होती. मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान ही बस समृद्धी महामार्गावर सिमेंटच्या कठड्याला जाऊन धडकली. या अपघातानंतर बसने पेट घेतला, त्यानंतर लागलेल्या आगीत तब्बल 25 प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले. अक्षरशः या प्रवाशांचा जळून कोरपा झाला. त्यामुळे समृद्धी महामार्गावरचा आता पर्यंतचा सर्वात भीषण अपघात आहे.

Buldhana Bus Accident: Case of culpable homicide against bus driver Danish Sheikh

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात