Buldhana Bus Accident : अपघात का, कसा घडला?; समृद्धी महामार्ग अपघातात 26 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख मदत जाहीर


प्रतिनिधी

बुलढाणा : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. विदर्भ एक्सप्रेस ही खासगी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली. Buldhana Bus Accident

एकनाथ शिंदे म्हणाले, हा अपघात अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. विदर्भ एक्स्प्रेस ही खासगी बस नागपूरहून निघाली होती. मी पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. यात दुर्दैवाने 26 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. जे सुखरूप आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

– अपघाताची चौकशी होईलच

अपघात कशामुळे झाला, नेमकं काय घडलं?, याची चौकशी तर होईलच. मात्र, मी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. तशाप्रकारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रवाशांची ओळख पटवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. अपघातातील मृतांच्या कुटुंबांना सरकार 5 लाख रुपयांची मदत देईल, अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.

– नेमके काय घडले?

विदर्भ एक्सप्रेस ही खासगी प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत 26 प्रवाशांचा मृत्यू झाला.

विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई १८१९ क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला.

Buldhana Bus Accident

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात