आर्मी इंटेलिजन्सच्या लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ अधिकारी असलेल्या ब्रिगेडियरनेच या महिलेला अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे कंटाळून या महिलेने आत्महत्या केली. Brigadier charged in Army Intelligence women lieutenant colonel’s suicide, threatened to make viral pornographic photos and videos
विशेष प्रतिनिधी
पुणे : आर्मी इंटेलिजन्सच्या लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ अधिकारी असलेल्या ब्रिगेडियरनेच या महिलेला अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे कंटाळून या महिलेने आत्महत्या केली.
जयपूर येथे पोस्टिंग असलेल्या आर्मी इंटेलिजन्समध्ये काम करणाऱ्या एका लेफ्टनंट कर्नल महिलेने पुण्यातील आर्मी क्वॉर्टर्समध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी लष्करातील एका ब्रिगेडियर विरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या ब्रिगेडियरने या महिलेला अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. ही घटना बुधवारी (13 सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली होती.
सुपिरियर ऑफिसर ब्रिगेडियर अजित मिलू (रा. ब्रिगेडियर जनरल स्टाफ हेदक्वार्टर, आर्मी ट्रेनिंग कमांड, सिमला, हिमाचल प्रदेश) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या महिला अधिकाऱ्याच्या 43 वर्षीय पतीने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळच्या डेहरादून येथील 42 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिलेने आत्महत्या केली होती. त्यांना 17 वर्षांचा मुलगा असून तो देहरादून येथे राहतो. त्यांचे वडील निवृत्त कर्नल असून पती हे देखील कर्नल आहेत. मागील काही वर्षांपासून त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू आहेत. यासंदर्भात त्यांनी न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी देखील अर्ज दाखल केलेला आहे.
आरोपी ब्रिगेडियरने या महिला लेफ्टनंट कर्नल सोबत प्रेमाचे नाटक करून त्यांना लग्नाचे आमिष दाखविले होते. त्यांच्याशी संबंध ठेवले. त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी देण्यात आली. या धमकीला घाबरून या महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या पतीने दिल्याचे उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाईल समोर ठेवला होता. या मोबाईलची देखील तपासणी अद्याप सुरू आहे. ही महिला लेफ्टनंट कर्नल महिला पुण्यातील आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये सहा महिन्यांचा प्रशिक्षणासाठी आली होती. यातील तीन महिने त्यांच्या प्रशिक्षणाला पूर्ण झालेली होती. त्यांना राहण्यासाठी ऑफिसर्स मेसमध्ये वन बीएचके क्वॉर्टर्स देण्यात आले होते. तेथेच त्यांनी पंख्याला गळफास घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App