क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात बंद असलेल्या आर्यन खानला जामीन मिळाला आहे. मात्र, आजची रात्र त्याला तुरुंगातच काढावी लागणार आहे. उद्या कोर्ट यावर विस्तृत निकाल सुनावणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दुपारी 3 वाजता सुरू झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने 4.45 वाजता निकाल दिला. आरोपींच्या जामिनाला विरोध करताना, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांनी एनसीबीच्या वतीने युक्तिवाद केला.Breaking News Bombay High Court grants bail to Aryan Khan in drugs-on-cruise case
वृत्तसंस्था
मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात बंद असलेल्या आर्यन खानला जामीन मिळाला आहे. मात्र, आजची रात्र त्याला तुरुंगातच काढावी लागणार आहे. उद्या कोर्ट यावर विस्तृत निकाल सुनावणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दुपारी 3 वाजता सुरू झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने 4.45 वाजता निकाल दिला. आरोपींच्या जामिनाला विरोध करताना, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांनी एनसीबीच्या वतीने युक्तिवाद केला.
आर्यनला जामीन मिळाल्यास पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते, असे ते म्हणाले होते. एएसजींनी सांगितले की, आर्यन गेल्या काही वर्षांपासून नियमित ड्रग्ज घेत आहे. तो अनेक लोकांना ड्रग्ज पुरवत असल्याचे रेकॉर्ड दाखवतात. सापडलेल्या अमली पदार्थांच्या प्रमाणावरून तो अमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Bombay High Court also grants bail to Arbaz Merchant and Munmum Dhamecha in drugs-on-cruise case — ANI (@ANI) October 28, 2021
Bombay High Court also grants bail to Arbaz Merchant and Munmum Dhamecha in drugs-on-cruise case
— ANI (@ANI) October 28, 2021
आम्ही ड्रग्जचे सेवन तपासले नाही, असे वारंवार विचारले जात आहे, असा प्रश्न एएसजींनी उपस्थित केला. त्यांनी ते सेवन केले नसताना तपासाचा प्रश्नच नाही का? आर्यनकडे ड्रग्ज सापडल्याचं हे प्रकरण आहे. एनसीबीने म्हटले की आर्यन जवळपास दोन वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करत असून तो कटाचा एक भाग आहे. त्याला क्रूझवर ड्रग्जची माहिती होती. आर्यनला जामीन देता येणार नाही.
त्यावर कोर्टाने विचारले की, आर्यनच्या ड्रग्ज व्यापाराच्या आरोपाचा आधार काय? या प्रश्नावर एनसीबीने सांगितले की, आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून हे प्रकरण समोर आले आहे. एनसीबीच्या दाव्यावर आर्यन खानची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, एनसीबीने कटाचे पुरावे द्यावेत. आर्यनला माहिती नव्हते की त्याच्या मित्राकडे ड्रग्ज आहे. आर्यन खानने कोणतेही षडयंत्र रचलेले नाही.
आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना NCB टीमने 2 ऑक्टोबर रोजी क्रूझ येथून ताब्यात घेतले होते. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने क्रूझवर छापा टाकून ड्रग्ज जप्त केले होते. या आरोपावरून या लोकांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर सर्वांना अटक करण्यात आली. याप्रकरणी एनसीबीने 20 जणांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांना जामीन मिळाला आहे.
विशेष म्हणजे, एनडीपीएस प्रकरणांसाठी विशेष न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App