काका – पुतण्याची “आतून” किंवा “बाहेरून” युती; पण दोन्ही बुडत्यांना वाचविणार का ऐक्याची काडी??

Pawar

नाशिक : काका – पुतण्याची आतून किंवा बाहेरून युती; पण दोन्ही बुडत्यांना वाचविणार का ऐक्याची काडी??, असा सवाल पवार काका – पुतण्यांच्या राजकीय हालचालीवरून समोर येऊन राहिलाय.

पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात अडकलेले अजित पवार आणि सातत्याने पक्ष फुटीला सामोरे जावे लागत असणारे शरद पवार एकत्र येण्याच्या बातम्या तर भरपूर आल्या. आज पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी त्या बातम्यांना दुजोरा दिला. सुप्रिया सुळे यांनी म्हणे, अजित पवारांकडे प्रस्ताव पाठवला की आपण दोघेही एकत्र येऊन पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका लढवू, अशी माहिती योगेश बहल यांनी अजित पवार यांचा हवाला देऊन पत्रकारांना सांगितली. योगेश बहल यांना खुद्द अजितदादांनी ती माहिती दिल्याचा दावा त्यांनी स्वतःच केला.

– जमीन घोटाळ्यात दोघे एकच

पवार काका – पुतणे एकच आहेत. जमीन घोटाळ्यांमध्ये सापडले की ते एकमेकांना वाचवायला एकत्र येतातच हे सगळे महाराष्ट्राने नुकतेच अनुभवले. पार्थ भाच्याच्या समर्थनासाठी आत्या सुप्रिया सुळे पुढे आल्या. त्यांनी स्वतःच “न्यायाधीश” असल्याच्या थाटात पार्थला परस्पर क्लीन चिट देऊन टाकली. त्यामुळे पवार काका – पुतणे आतून एकच आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला दिसले. त्या पलीकडे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवार काका – पुतणे “आतून” किंवा “बाहेरून” एकत्र येणार हे उघडपणे बोलले गेले होते ते फक्त योगेश बहल यांनी अजितदादांच्या हवाल्याने confirm केले.

– सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव तरी का??

सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांकडे तो प्रस्ताव का दिला असेल??, तर पवारांचा पक्ष स्थानिक पातळीवर सातत्याने फुटतोय पवार संस्कारित सगळे छोटे-मोठे नेते आणि कार्यकर्ते अजितदादांकडे जाऊन राहिलेत. अशा स्थितीत पवारांच्या पक्ष संघटनेचे मूळ अस्तित्वच धोक्यात आले आहे. असा ना तसा पक्ष संपणारच असेल तर मी जाईल अजितदादांच्या पुढे एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव ठेवला तर निदान आपला उरला सुरला पक्ष तरी वाचू शकेल, अशी सुप्रिया सुळेंना आशा वाटत असावी.



– भाजप नावाचा शक्तिशाली factor

पण म्हणून “ते” “तसेच” घडेल याची महाराष्ट्राच्या राजकारणात आज तरी शक्यता नाही. कारण यात भाजप नावाचा एक प्रचंड शक्तिशाली factor आपले हातपाय गुंतवून आहे. भाजपने आणि त्यांच्या केंद्रीय नेत्यांनी खऱ्या अर्थाने मान्यता दिली, तर आणि तरच मोठ्या महापालिका मोठ्या जिल्हा परिषदा या निवडणुकांमध्ये पवार काका – पुतणे खऱ्या अर्थाने एकत्र येऊ शकतील अन्यथा ते “आतून” कितीही एकत्र आले, तरी भाजप त्यांच्यात पाचर मारल्याशिवाय राहणार नाही. कारण पवार काका – पुतण्यांचे आणि विशेषत: पवार पुतण्याचे हातच एवढ्या मोठ्या दगडाखाली अडकलेत, की ते सोडवून घेणे हा पवार काका – पुतण्यांचा घासच उरलेला नाही. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांची आणि मुख्यमंत्र्यांची त्यांना 100 % गरज लागेल. पवार काका – पुतण्यांकडून त्याची राजकीय किंमत पुरती वसुली करून घेतल्याशिवाय भाजप पवार पुतण्याचे हात दगडाखालून सोडवून देणार नाही.

– पवारांना राजकीय किंमत चुकवावीच लागेल

पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद ही महत्त्वाची राजकीय किंमत पवार काका – पुतण्यांना चुकवावीच लागेल आणि भाजप म्हणेल त्या अटी शर्तींवर तिथल्या सत्तेत काहीसा वाटा मिळवावा लागेल. पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद इथली सत्ता आता पवार काका पुतण्यांना निरांकुश उपभोगता येणार नाही. तिथे आपल्या चेलाचपाट्यांना एक तर भाजपच्या वळचणीला पाठवावे लागेल किंवा आपल्या छत्रछायेखाली ठेवून भाजपच्या मर्जीनुसार वागावे लागेल, तर आणि तरच भाजप पवार पुतण्याचे हात जमीन घोटाळ्याच्या दगडा खालून सोडवून देईल. पण यातही पवारांनी नेहमीच्या सवयीनुसार काही games खेळायचा प्रयत्न केला, तर यात पवार काका – पुतण्याचे पक्ष बुडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि दोघांच्या ऐक्याची काडी या दोघांना वाचवू शकणार नाही. कारण आज पवार काका – पुतण्यापुढे झुकायला भाजप नावाचा पक्ष हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सारखा झुकणारा उरलेला नाही. भाजपला पवारांच्या बालेकिल्ल्यात पाचर मारायची आहे. ती संधी भाजपचे नेते सहजासहजी सोडणार नाहीत.

BJP to wedge Pawar uncle nephew unity

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात