Sharad Pawar : पवारांवर टीका करणाऱ्या पडळकर + खोतांना भाजप समज देणार; पण त्यांना बारकी – चिरकी उंदीरं म्हणणाऱ्यांना काय करणार??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजप समज देणार, ही माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पण पवारांवर टीका करणाऱ्या पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना बारकी चिरकी उंदीरं म्हणणाऱ्या आमदार उत्तम जानकारांचे काय करणार??, याबद्दल मात्र भाजप किंवा पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही सांगितले नाही.

Devendra Fadnavis : पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

शरद पवार दोनच दिवसांपूर्वी मारकडवाडीत जाऊन आले त्यांनी तिथे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरोधात सभा घेतली. मारकडवाडीचे आंदोलन एकतर्फी होऊ नये म्हणून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी दुसऱ्या दिवशी तिथेच जाऊन सभा घेतली. त्यावेळी केलेल्या भाषणामध्ये गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती.

100 शकुनी मामा मेले, त्यानंतर शरद पवार जन्माला आले, असे शरसंधान गोपीचंद पडळकर यांनी साधले होते. मात्र त्यावरून शरद पवारांची राष्ट्रवादी प्रचंड संतापली होती. महाराष्ट्रात पडळकर यांच्या भाषणाची फार मोठी चर्चा झाली. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याविषयी पडळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानंतर सगळ्यांनी त्यांना घेरले होते. त्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज खुलासा केला. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर वैयक्तिक टीका भाजपला मान्य नाही. आम्ही आमदारांना समज देऊ, असे ते म्हणाले.

– जानकारांचीही टीका खालच्याच पातळीची

पण पडळकर आणि खोत यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी, असली बारकी चिरकी 5 उंदीरं रोज पवार साहेब नाश्त्याला खातात, अशी टीका पडळकर आणि खोतांवर केली होती. पडळकर यांची पवारांवरची टीका जशी खालच्या पातळीची होती, तशीच उत्तम जानकर यांनी केलेली टीका देखील खालच्याच पातळीची होती. मात्र त्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीने उत्तम जानकर यांना कुठली समज दिल्याची बातमी अद्याप तरी समोर आलेली नाही. किंवा बावनकुळे यांचे त्यासंदर्भातले वक्तव्य देखील समोर आले नाही.

BJP to act against padalkar and khot over criticism of sharad pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात