‘साडेतीन जिल्ह्याच्या जिल्हेहिलाईचा मुंब्रा स्थित मानसपुत्र हिंदुद्वेषी जितुद्दीन’

प्रभू रामाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आव्हाडांवर भाजपचा घणाघात


विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रभू रामाच्या आहारावरून वादग्रस्त विधान करणाऱ्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांवर आता सर्वत्र जोरदार टीका सुरू आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून आव्हाडांचा निषेध नोंदवला जात आहे. शिवाय, शिंदे, अजित पवार गटानेही निशाणा साधाल आहे. यानंतर आता भाजपने जितेंद्र आव्हाडांवर घणाघात केला आहे.BJP strongly criticized Jitendra Awad who made a controversial statement about Lord Rama

प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते आणि ते बहुजनांचे आहेत असा त्यांनी दावा केला आहे. राम शिकार करून मांस खात असे. म्हणूनच आम्ही पण मांसाहारी आहोत, पण तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला जात आहात, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.



यावरून भाजपाने आव्हाडांवर टीका करत म्हटले की, ‘साडेतीन जिल्ह्याच्या जिल्हेहिलाईचा मुंब्रा स्थित मानसपुत्र हिंदुद्वेषी जितुद्दीन! कधी काळी प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारा आज त्यांचं अस्तित्व सांगतोय आणि आता तर चक्क खोटे रामायणाचे धडे देऊ लागलाय. संकष्टी चतुर्थीला मटणाचे खांड चघळणाऱ्या भांड स्वयंघोषित नेत्याला सकल हिंदू समाज जागा दाखवणार.’

जितुद्दीन आव्हाड तुमचा जाहीर निषेध!

याशिवाय ‘जितुद्दीन आव्हाडांना आज चक्क प्रभू रामचंद्र आठवले. जसे आचार तसे विचार त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं दिसतो. यांना हिंदू दैवतांचा अपमान करण्यात काय धन्यता वाटते माहीत नाही. खोटा आणि सोयीचा इतिहास लिहण्याची तुम्हा लोकांची जुनी खोड रामभक्त सहन करणार नाहीत. लक्षात ठेवा वाल्यानं रामायण लिहलं नव्हतं त्यासाठी त्याला वाल्मिकी व्हावंच लागलं होतं. प्रभू रामचंद्र तुम्हाला सद्बुध्दी देवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना!’ असं भाजपने म्हटलं आहे.

BJP strongly criticized Jitendra Awad who made a controversial statement about Lord Rama

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात