‘’…आधी स्वतःच्या पक्ष हिंदुत्वाची विचारधारा सोडल्याने नामशेष झाला आहे ते बघा’’ – भाजपाचा पलटवार!

Keshav Uppadye and Uddhav Thakrey

छत्रपती संभाजीनगरमधील सभेतून भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला केशव उपाध्येंकडून प्रत्त्युत्तर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीची काल छत्रपती संभाजीनगर शहरात वज्रमूठ सभा पार पडली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. या टीकेला आता भाजपाकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. BJP spokesperson Keshav Upadhye response to Uddhav Thackerays criticism of BJP and PM Modi

केशव उपाध्ये म्हणाले, ‘’औरंगजेबाचे फोटो लावून उदात्तीकरण करणाऱ्यांबद्दल एक शब्दही नाही. छत्रपती संभाजीनगर या नावाला विरोध करणाऱ्या MIM बद्दल एक अवाक्षरही नाही. श्रीराम मंदिरासमोरील दंगलीबद्दल मूग गिळून गप्प. अहो उद्धव ठाकरे भाजपला नामशेष करणं सोडा, आधी स्वतःच्या पक्ष हिंदुत्वाची विचारधारा सोडल्याने नामशेष झाला आहे ते बघा.’’


‘’औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर झाले, तरीही काहींच्या रक्तात …’’ आशिष शेलारांचा महाविकास आघाडीवर निशाणा!


याशिवाय, ‘’एकीकडे सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून वसूली सत्ता भोगली, महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं आणि आता सावरकर आठवले?  पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न सोडा तो योग्य वेळी निकाली लागेलच, पण तुम्ही आधी महाराष्ट्राची चिंता केली असती तर बरं झालं असतं.’’ असा टोलाही उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरेंचं मोदी सरकारला आव्हान –

हिंमत असेल, तर सावरकरांना भारतरत्न द्या आणि पाकव्याप्त काश्मीर जिंकून दाखवून सावरकरांचे स्वप्न पूर्ण करा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला दिले आहे. तसेच, वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी वीर सावरकर गौरव यात्रेचाही उल्लेख केल. सावरकर गौरव जरुर काढा. हिंदू जनआक्रोश नवीन सुरू झालाय. मुंबईत मोर्चा निघाला होता. कुठून काढला माहिती नाही. पण शिवसेना भवनपर्यंत आला होता. याचा अर्थ एकच जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर हिंदूंना आक्रोश करावा लागतोय मग नेत्याची काय शक्ती आहे?  महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोणत्याही समूदायाला आक्रोश करण्याची वेळ आली नव्हती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

BJP spokesperson Keshav Upadhye response to Uddhav Thackerays criticism of BJP and PM Modi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात