जास्त दिवसांच्या अधिवेशनासाठी भाजपचा जोर; मंत्र्यांच्या बचावासाठी महाविकास आघाडीच्या बैठका…!!

प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्रातील विरोधी भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडी यांनी विधिमंडळ अधिवेशनात एकमेकांवर तुटून पडण्यासाठी रणनीती आखली आहे. पण विधिमंडळाचे अधिवेशन दोनच दिवसांमध्ये गुंडाळण्यापेक्षा जास्त दिवसांचे घ्यावे यासाठी भाजपने जोर लावला आहे. तर ठाकरे – पवार सरकारच्या मंत्र्यांचा चौकशीच्या फेऱ्यांमधून वाचविण्यासाठी महाविकास आघाडीचा बैठका पार पडत आहेत. BJP on offensive mode in maharashtra aseembly session, MVA on defensive path

विधिमंडळ अधिवेशनात ठाकरे – पवार सरकारला घेरण्याची रणनीती ठरविण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक झाली. यामध्ये अनेक मंत्र्यांना घेरण्याचे निश्चित करण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिश शेलार, प्रवीण दरेकर आदी नेते बैठकीला हजर होते.



तर महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक मु़ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत पावसाळी अधिवेशन संदर्भातील रणनीती तसेच विधानसभा अध्यक्षपदा निवडणुकीसंदर्भात महत्वाची चर्चा झाली. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी देखील उपस्थित होते.

अजित पवार, अनिल परब यांच्यासह विविध मंत्र्यांवर भाजपचे नेते गंभीर आरोप करीत आहेत. अनेक मंत्र्यांच्या मागे सीबीआय, ईडीच्या चौकशीचे शुक्लकाष्ट लागू शकते. या पार्श्वभूमीवर या मंत्र्यांचा बचाव कसा करायचा, यावर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत चर्चा झाली.;

BJP on offensive mode in maharashtra aseembly session, MVA on defensive path

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात