प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मधील संभाव्य मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेबाबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खोचक शब्दांमध्ये विधान परिषदेत शरसंधान साधले आहे याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. BJP mlc gopichand padalkar targets sharad Pawar, supriya sule and ajit Pawar over prime ministership and chief ministership issue
गंभीर प्रश्नावर उपाय… “लवासा, मगरपट्टा, बारामती ही तीन छोटी राज्ये स्थापन करून तिघांना मुख्यमंत्री व या राज्यांचा एक देश स्थापन करून काकांना पंतप्रधान केलं पाहिजे, तेव्हाच यांचं स्वप्न पूर्ण होईल. अन्यथा, मला काय यांचं स्वप्न कधी पूर्ण होईल असं वाटत नाही, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
शरद पवार हे गेली 32 वर्षे भारताच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांचे नाव मराठी माध्यमे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणत असतात. राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या पंतप्रधान पदाविषयी नेहमी काही ना काही तरी भाष्य करत असतात.
त्यानंतर राष्ट्रवादीला आतापर्यंत कधीही न मिळालेल्या मुख्यमंत्री पदाची देखील स्पर्धा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची पोस्ट वाळवा मतदार संघात झळकवली. त्या पाठोपाठ मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयासमोर खासदार सुप्रिया सुळे आणि अजितदादा पवार यांच्या नावाची देखील भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकली होती. या पार्श्वभूमीवरच आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत खोचक टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App