विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर अधिवेशनाशी संबंधित असलेल्य ३२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.BJP MLA Sameer Meghe corona positive
भाजप आमदार समीर मेघे यांनी काल फेसबुकवर पोस्ट करत स्वत:ला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करुन घेण्याचा सल्लाही दिला होता. दरम्यान, आता अधिवेशनातीलच एकून 32 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोरोनाची लागण झाल्याचं कळताच समीर मेघे हे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. नागपुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ऐन हिवाळी अधिवेशनात सभागृहातीलच एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं सगळेच धास्तावले होते. आता अधिवेशनातीलच 32 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.
ज्या 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामध्ये किती आमदार आहेत, असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. मात्र सध्या तरी याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विधानसभा अधिवेशातील पोलीस, अधिवेशनातील कर्मचारी वर्ग यांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा सोमवारी महत्त्वाचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठीची प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. त्याआधीच गेल्या दोन दिवसांत विधानसभा अधिवेशनातील एका आमदारानंतर 32 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने अधिवेशनाचे कामकाज होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App