मेघे यांनी फेसबुकवर याबाबतची माहिती दिली होती.दरम्यान राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात समीर मेघे सहभागी झाले होते. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.BJP MLA Sameer Meghe along with 32 others in the convention
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रोन दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती.मेघे यांनी फेसबुकवर याबाबतची माहिती दिली होती.दरम्यान राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात समीर मेघे सहभागी झाले होते. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मेघे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून शनिवारी (२५ डिसेंबर) १५०० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.त्यापैकी तब्बल ३२ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ३२ कोरोनाबाधितांमध्ये पोलीस कर्मचारी, काही मंत्रालय कर्मचारी तसेच विधानभवनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
BJP MLA Sameer Meghe along with 32 others in the convention
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App