BJP MLA Gopichand Padalkar : राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून राज्यातील ठाकरे-पवार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सत्तेत आल्यापासूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार बहुजनांच्या आरक्षणाच्या मुळावर उठले असल्याची टीका पडळकरांनी केली आहे. शरद पवार यांच्या घरी चाकरी करणारा आणि पदोन्नतीतील आरक्षण संपवणारा सरकारी वकील कोण? असा प्रश्नही पडळकरांनी उपस्थित केला आहे. bjp mla gopichand padalkars criticizes sharad pawar and thackeray government Over OBC and Promotion Reservation
विशेष प्रतिनिधी
सांगली : राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून राज्यातील ठाकरे-पवार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सत्तेत आल्यापासूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार बहुजनांच्या आरक्षणाच्या मुळावर उठले असल्याची टीका पडळकरांनी केली आहे. शरद पवार यांच्या घरी चाकरी करणारा आणि पदोन्नतीतील आरक्षण संपवणारा सरकारी वकील कोण? असा प्रश्नही पडळकरांनी उपस्थित केला आहे.
आमदार पडळकरांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार मराठा, धनगर, ओबीसी आणि पदोन्नती आरक्षण देण्यात अपयशी ठरलंय. या सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही. शरद पवारांच्या घरी चाकरी करणारा आणि पदोन्नती आरक्षण संपवणारा सरकारी वकील कोण? असा सवाल करत पडळकरांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे.
किती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी प्रेरित होऊन सतेत काम करतात, याचे उद्बोधन करनार आहे.@BJP4Maharashtra#Congress #OBC #reservation — Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) (@GopichandP_MLC) June 4, 2021
किती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी प्रेरित होऊन सतेत काम करतात, याचे उद्बोधन करनार आहे.@BJP4Maharashtra#Congress #OBC #reservation
— Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) (@GopichandP_MLC) June 4, 2021
पडळकर म्हणाले की, सत्तेची वेसन घातलेले काँग्रेसचे मंत्री लाचार आहेत. सोनिया गांधी यांनी सरकारला राज्यातल्या मागासवर्गीय, अनुसूचित जातींच्या हक्काचं संरक्षण करण्याचं पत्र पाठवलं आहे. परंतु या ठिकाणी अन्याय होत असताना काँग्रेसचे मंत्री सत्तेला चिकटून बसले आहेत. याबाबत लवकरच सोनिया गांधींना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
पवारांच्या नेतृत्वातील हे आघाडी सरकार बहुजनद्वेष्टे असल्याचे सिद्ध झाल्याचं पडळकरांनी म्हटलं. एवढेच नव्हे, तर सरकारला मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षणाविषयी सुप्रीम कोर्टात कोणतंही पाऊल उचलण्याची घाई नाही. पण न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
bjp mla gopichand padalkar criticizes sharad pawar and thackeray government Over OBC and Promotion Reservation
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App