विशेष प्रतिनिधी
मुंबई:एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे तर दुसरीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे.ह्या धोक्याचा इशारा 2020 मध्येच भाजप आमदार डॉ.रणजित पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला होता.BJP MLA Dr. Ranjit Patil had given a warning about oxygen in 2020 itself.
ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार हे 2020 साली माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले होते. मात्र, त्याकडे ठाकरे सरकारने कानाडोळा केल्याचे आता उघड झाले आहे.
पहा हा व्हिडिओ…
काय म्हणाले होते रणजित पाटील?
सध्या परिस्थिति आणिबाणीची आहे प्रत्येक जिल्हयात ऑक्सिजन एलजी प्लांट्स नाही उभा केले तर ऑक्सिजनच्या आणिबाणीला समोर जावे लागेल .व्हेंटीलेटर्स असून चालणार नाही. औषध असून चालणार नाही. रूग्णांचे SPO2 जर 92 च्या खाली गेले तर ऑक्सिजन शिवाय कुठलाही पर्याय राहत नाही.
यासाठी किमान 15 LG प्लांट्स उभे रहावे जेणेकरून एका प्लांट मधून 900 सिलिंडर तयार होतील. किमान इतके प्लांट्स तरी उभे करावे….
त्यावेळी जर महाविकास आघाडी सरकारने रणजित पाटील यांच्या सुचनेकडे लक्ष दिले असते तर आज महाराष्ट्राने प्राणवायू विना प्राण त्यागले नसते….
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App