”…यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात?” आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला!

Aashish Shelar new

वाघनखांवरून आता महाराष्ट्रात वेगळंच राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध करण्यासाठी वापरलेली वाघ नखं आता लवकरच  महाराष्ट्रात येणार आहेत. सध्या ही ऐतिहासिक वाघनखं इंग्लंडमधील वास्तूसंग्रहालयात आहेत.  राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार याबाबत माहिती दिली असून, ते स्वत: ही वाघनखं आणण्यासाठी लंडनला रवाना होणार आहेत. BJP MLA Ashish Shelar criticizes Aditya Thackeray over his statement about Shivaji Maharajs historical tiger nails

दरम्यान, या वाघनखांवरून आता महाराष्ट्रात वेगळंच राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे. कारण,  ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या वाघनखांबाबत शंका उपस्थित करणारं विधान केलं आहे.  ज्यावर भाजपाने संतप्त प्रत्युत्तर  दिलं गेलं, त्यानंतर आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही एका छोट्या कवितेतून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधाल आहे.

”आपल्या कुटुंबातील हे कार्ट असे निपजल्याचे बघून बाळासाहेबांना खूप दुःख झाले असेल”

आशिष शेलार म्हणतात, ”वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले? छत्रपतींंच्या वंशजांकडे पुरावे मागणारे आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले? आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीय इथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय? महाराजांच्या पराक्रमाचेच इथे पुरावे मागतेय? आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का? यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात? अहो, पब मधला थरथराट बाहेर असा कोण करतो का? अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?”

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते? –

”महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की केवळ शिवकालीन आहे? याबाबत राज्य सरकारने सरकारने खुलासा करावा. हे शस्त्र किती वर्षांसाठी महाराष्ट्रात असणार आहे? याबाबतची माहिती सरकारने जाहीर करावी.”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

BJP MLA Ashish Shelar criticizes Aditya Thackeray over his statement about Shivaji Maharajs historical tiger nails

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात