“शरद पवारांबद्दल माझ्या मनात नेहमी आदरच राहिला आहे.मी जिवंत असेपर्यंत त्यांना गुरुच मनात राहील. कोणत्याही पक्षात असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमी गुरुच स्थान राहणार आहे.”अस चित्रा वाघ म्हणाल्या. BJP Leader Chitra Wagh Praises Sharad Pawar, Says As long as I am alive, Sharad Pawar is my guru
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपच्या महिला राज्य उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी आज शरद पवारांबद्दल आपल्या मनात आदर असल्याच्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, “शरद पवारांबद्दल माझ्या मनात नेहमी आदरच राहिला आहे. मी जिवंत असेपर्यंत त्यांना गुरूच मानत राहील. कोणत्याही पक्षात असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमी गुरूचं स्थान राहणार असल्याचंही त्या म्हणाल्या. तथापि, पक्ष का सोडला या पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनी टाळलं.
नगर जिल्ह्यातील सहा अत्याचारित पीडित कुटुंबांची चित्रा वाघ यांनी भेट घेतली होती.त्यानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, कोकण व पश्चिम महाराष्ट्र अतिवृष्टीने शेकडो नागरिकांचा मृत्यू होत आहे.नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेकांचे घर संसार पाण्यात बुडाले आहेत. राज्यावर आपत्ती असताना मुख्यमंत्री तिकडे जात नाही.
पुढे त्या म्हणाल्या की ,”विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरिष महाजन, निरंजन डावखरे हे अगोदर पुरग्रस्तांच्या मदतीला जातात आणि मग त्यांनतर मुख्यमंत्री जातात. हे जनतेकडे दुर्लक्ष असल्याचे लक्ष आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब हे जिल्हा संकटात असताना देखील मुंबईला पळून येतात .मुख्यमंत्री पंढरपूरला जाताना ड्रायव्हिंग केली आता त्यांच्या याच कौशल्याची गरज कोकणात आहे.”
यापुढे त्या म्हणाल्या की , कोरोना संकटात मुख्यमंत्री मातोश्री व वर्षा या दोनच निवासस्थानी राहतात. पण ते जर मंत्रालयात आले की लगेच बातमी होते. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातच जनतेच्या अडीअडचणी सोडवायला यायचं असत. परंतु त्यांना कोरोनात फक्त स्वतःच्या कुटुंबाची व स्वतःची काळजी वाटते.
खासदार संजय राऊत हे प्रत्येक प्रश्नांच्या वेळेस केंद्राकडे मदत मागतात. केंद्र सरकार तर मदत करणार आहे. परंतु राज्य सरकार म्हणून आपली काही जबादारी नाही का? राज्याने मागील वर्षी अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची पूर्ण रक्कम अजूनही दिलेली नाही अस देखील चित्र वाघ म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App