‘’औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर झाले, तरीही काहींच्या रक्तात …’’ आशिष शेलारांचा महाविकास आघाडीवर निशाणा!

Ashish Shelar

छत्रपती संभाजीनगरमध्ये काल झालेल्या वज्रमूठ सभेतून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली होती.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीची काल छत्रपती संभाजीनगर शहरात वज्रमूठ सभा पार पडली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदी नेत्यांची याप्रसंगी भाषणं झाली. या भाषणांमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली. या टीकेला आता भाजपाकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे निशाणा साधला आहे. BJP leader Ashish Shelar criticized the leaders of Mahavikas Aghadi

आशिष शेलार म्हणाले, ‘’औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर झाले, तरीही काहींच्या रक्तात हे ‘औरंगजेबी मनसुबे’ कायम! शेवटी कालच्या सभेत मोदींना नामशेष करण्याचे राक्षसी मनसुबे ओठावर आलेच. पण लक्षात ठेवा… गरीब, श्रमिकांचे कैवारी असलेल्या मोदींना ‘नामशेष’ करायला जाल तर तुम्हीच औरंगजेबासारखे ‘नामशेष’ व्हाल!’’

याशिवाय, ‘’महाविकास आघाडी म्हणून जे सोळा गोळा झालेत त्यांचा संकल्प काय? स्वतः विजयी होणे? नाही… जनतेचे प्रश्न सोडवणे? छे छे, तो तर अजिबातच नाही… देशासाठी काही करणे? हा विषय त्यांचा कधीच नव्हता आणि आजही नाही. मग यांचा किमान समान कार्यक्रम काय? भाजपाला “नामशेष” करणे!’’ असं म्हणत आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? –

वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी वीर सावरकर गौरव यात्रेचा उल्लेख केला गेला. सावरकर गौरव जरुर काढा. हिंदू जनआक्रोश नवीन सुरू झालाय. मुंबईत मोर्चा निघाला होता. कुठून काढला माहिती नाही. पण शिवसेना भवनपर्यंत आला होता. याचा अर्थ एकच जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर हिंदूंना आक्रोश करावा लागतोय मग नेत्याची काय शक्ती आहे?? महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोणत्याही समूदायाला आक्रोश करण्याची वेळ आली नव्हती, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

अजित पवार काय म्हणाले? –

अजित पवार म्हणाले की, भाजप – शिंदे सरकारची सावरकर गौरव यात्रा ही केवळ मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी आहे, त्यांना सावरकरांबद्दल कोणताही आदर नाही. तुमच्यात जर हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. सावरकर गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही, आम्हाला सर्व महापुरुषांबद्दल आदर, त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. पण भाजपच्या माजी राज्यपालांनी, नेत्यांनी या आधी महापुरुषांच्या विरोधात वक्तव्ये केली. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, छत्रपतींचा अपमान होताना तुमची दातखिळी बसली होती का??, असा सवाल अजित पवार यांनी केला.

BJP leader Ashish Shelar criticized the leaders of Mahavikas Aghadi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात