प्रतिनिधी
मुंबई : गाईंना होणाऱ्या लम्पी आजाराच्या मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजब दावा केला आहे. लम्पी हा आजार हा भाजप सरकारचा शेतकऱ्यांविरोधातील कट असल्याचा अजब आरोप पटोलेंनी केला आहे. ते भंडाऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या या टीकेवरून नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. BJP government’s plan to end Godhan from lumpy disease
नायजेरिया या देशात अनेक वर्षांपासून लम्पी हा आजार होता. आता भारतात आणलेले चित्तेही तिथूनच आणलेले आहेत. चित्त्यावरील ठिपके आणि लम्पी आजारात गायीच्या अंगावर पडणारे ठिपके सारखेच आहेत. हे चित्ते आणून सरकारने काय साध्य केले? देशात गरिबी, बेरोजगारी, महागाई, सीमावाद मोठ्या प्रमाणात असताना चित्ता आणून नुसता देखावा केल्याची टीका पटोलेंनी केली आहे.
गोधन संपवण्याचा डाव
केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी जाणीवपूर्वक ही व्यवस्था केली आहे. भाजपने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना बरबाद करण्याची व्यवस्था केली आहे, त्यावरून शेतकऱ्यांनाही कळले आहे की भाजप शेतकरी विरोधी आहे. भाजप शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना बरबाद करण्यासाठी लम्पी या रोगाची धास्ती दाखवून गोधन संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. नाना पटोलेंनी केलेल्या या अजब दाव्यामुळे राजकीय वर्तुळात वाद रंगण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App