”तुम्हाला आता गोध्राची स्वप्न पडू लागली हे जाहीर झालं. पण…” असंही भाजपाने म्हटलं आहे.
मुंबई : अयोध्येतील राम मंदिर आता पूर्णत्वास येत आहे. मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. दरम्यान आता राम मंदिराच्या उद्घाटन समारंभावरूनही राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुद्य्यावर बोलताना केलेल्या टीकात्मक विधानानंतर आता भाजपाने त्यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. BJP criticizes Uddhav Thackeray over his statement on Ram temple in Ayodhya
भाजपाने म्हटले आहे की, ”उद्धव ठाकरे तुमची अवस्था पोपट घेऊन भविष्य सांगणारा भोंदू असतो ना तशी झाली आहे. गेले कित्येक दिवस तुम्ही अनेक भविष्य वर्तवत आहात. की अमुक ठिकाणी भाजप दंगली घडवणार तमूक ठिकाणं पेटणार. त्यात तुमचा पोपट चिठ्ठ्या काढत नाही तर तो वर्तमान पत्रात खोटे भविष्य लिहून तो मिडीयासमोर येऊन बरळतोही. यामागचा करता करविता कोण हे संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारत देशाला माहीत आहे.”
याशिवाय, ”सध्या तुम्ही समस्त हिंदुंच्या राम मंदिरावरूनही तोंड उघडून टीका केली. तुम्हाला आता गोध्राची स्वप्न पडू लागली हे जाहीर झालं. पण उध्दव साहेब हे हिंदूंच राष्ट्र आहे आणि राम मंदिर हे प्रत्येक हिंदूंच स्वप्न. तुमचे इरादे नेक नाहीत हे स्पष्ट कळतं पण तमाम हिंदू तुमच्या भविष्य वजा धमक्यांची दखल घेत आहे. जनाब सियासत के लिये निकले है देश को जलाने, हम भी भक्त सच्चे राम के आपके इरोदो की लंका जलाना जानते है…” असं म्हणत भाजपाने उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले? –
राम मंदिरासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने हिंदू बोलावयाचे, त्यांनी बस, गाड्या, रेल्वेने मोठ्यासंख्येने यायचं आणि तिकडून परतताना मध्ये कुठेतरी गोध्रा घडावयाचा डाव आहे. होऊ शकतं असं, हल्ला होऊ शकतो. कोणत्यातरी वस्तीत बस जाळतील दगडफेक करतील. माणसं मारतील पुन्हा देश पेटेल, पुन्हा घरांच्या होळ्या पेटतील आणि त्या पेटणाऱ्या घरांच्या होळीवरती यांच्या राजकीय पोळ्या ते भाजतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App