
प्रतिनिधी
उल्हासनगर : महापालिकेतील भाजपचे तरुण नगरसेवक अजित उर्फ पप्पु गुप्ता यांच्या कारला शुक्रवारी (दि. 12) रात्री मुरबाड रोडवरील पाचवा मैल येथे अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सोबत कारमध्ये असलेला त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला.BJP corporator Ajit Gupta from Ulhasnagar died in accident
त्यांच्या पश्चात वडील व माजी नगरसेवक प्रभुनाथ गुप्ता, आई, पत्नी, मुले, भाऊ असा मोठा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील सुभाषनगर परिसरातून अजित गुप्ता साई पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. महापौर पदाच्या निवडणुकीत साई पक्ष भाजपमध्ये समाविष्ट झाला.
शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान नगरसेवक गुप्ता हे मित्रासोबत मुरबाड वरून उल्हासनगरला घरी येत होते. पाचवा मैल येथील एका धोकादायक वळणावर पिकअप टेम्पो व कारची जोरदार धडक झाली. यात गुप्ता आणि त्यांचा मित्र गंभीर जखमी झाले. पिकअप टेम्पो मधील दोघेही जखमी झाले. सर्वांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी अजित गुप्ता यांना मृत घोषित केले.अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरातील सुभाषनगर, पंजाबी कॉलनी परिसरात कट्टर पप्पू कलानी समर्थक असलेल्या प्रभुनाथ गुप्ता यांचे राजकीय वर्चस्व आहे. मात्र तिकीट वाटपावरुन त्यांचे कलानीं सोबतचे संबंध बिघडले. त्यामुळे गुप्ता यांनी स्थानिक साई पक्षात प्रवेश घेतला. प्रभुनाथ गुप्ता हे त्यांच्या पत्नीसह याच परिसरातून नगरसेवक पदी निवडून आले. गेल्या निवडणुकीत मुलगा अजित नगरसेवक पदी निवडून आला होता.
BJP corporator Ajit Gupta from Ulhasnagar died in accident
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात भाजपाच सत्ता राखणार, सुधारलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळेच यश, योगी आदित्यनाथांच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती
- गोवा, मणिपूरमध्ये भाजपच मारणार बाजी, कॉँग्रेसपेक्षा आपला जादा पसंती
- पंजाबमध्ये कॉँग्रेसला पराभवाचा धक्का बसणार, आप मारणार विधानसभा निवडणुकीत बाजी
- सध्याच्या राजकारणात पोरखेळ, राज्यात बिग बॉसचा शो सुरू, पंकजा मुंडे यांची टीका
- एनसीबीचे उपमहासंचालक म्हणाले यंत्रणा स्वच्छ करायचीय, समीर वानखेडे यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते