नाशिक : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजारपण ज्या पद्धतीने आणि वेगाने वाढते आहे, ते पाहता वाढवून ठेवलेल्या महत्त्वाकांक्षा, की काट्याचा होत चाललाय नायटा??, असा संशय उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरले आहे. सतत 24 तास काम करणारा माणूस शरीर थकल्याने आजारी पडणे स्वाभाविक मानले पाहिजे, पण ते आजारपण जर “राजकीय टाइमिंग” साधून येत असेल, तर त्या नेत्याच्या आजारपणाकडे संशयाची सुई वळल्यास ते देखील स्वाभाविक मानले पाहिजे.
ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे अमित शाह यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानातल्या बैठकीनंतर मुंबईत पोहोचले आणि त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातल्या दरेगावला गेले, ते राजकीय संशय निर्माण करणारेच होते. परंतु, स्वतःच एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात सगळा खुलासा केल्यानंतर संशयाचे मळभ दूर झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबई आणि ठाण्यात परतले. आज त्यांचे आजारपण पुन्हा बळवल्याच्या बातम्या आल्या. त्यातच दाढीला एवढे हलक्यात घेऊ नका, असे संजय शिरसाट यांचे संजय राऊत यांना उद्देशून केलेले वक्तव्य समोर आले, पण “लेकी बोले, सुने लागे”, या म्हणीनुसार माध्यमांनी त्याचा अर्थ काढला आणि संजय शिरसाट यांचे बोट उचलून त्यांनी भाजपच्या दिशेने दाखवून दिले.
या सगळ्यांमध्ये जर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे दोन पत्रकार परिषदांमधून खुलासे केले आहेत, तर महाराष्ट्रात सरकार स्थापन व्हायला नेमका वेळ का लागतो आहे?? आणि तो वेळ लागत असल्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रात उरल्या सुरल्या ठाकरे + पवार आणि काँग्रेस या विरोध विरोधी पक्षांना प्रचंड बहुमत असलेल्या महायुतीवर तोंडसुख घेण्याची संधी मिळते आहे, हे महायुतीच्या नेत्यांना लक्षात येत नाही का?? अन्यथा सरकार स्थापन होण्यासाठी एवढा वेळ लागायचे कारण नव्हते.
Sadabhau Khot सदाभाऊ खोतांचा बाबा आढावांना सवाल- मुस्लिमबहुल भागात महायुतीला कमी मते मिळतात, तिथे EVM मविआसाठीच कसे सेट होते?
त्याचबरोबर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षा भाजपच्या नेतृत्वानेच वाढवून ठेवल्या. अगदी अडीच वर्षांपूर्वी त्यांना उपमुख्यमंत्री पद आणि महत्त्वाची खाती देऊन त्यांचे बंड यशस्वी होण्याची “राजकीय व्यवस्था” करणे शक्य असताना भाजपच्या नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसतानाही त्यांना मुख्यमंत्री केले. देवेंद्र फडणवीस यांची सरकार बाहेर राहण्याची इच्छा असताना सरकारच्या स्थिरतेच्या नावावर त्यांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हायला भाग पाडले. त्यानंतर शिंदे – फडणवीस जोडगोळीने उत्तम समन्वय राखून कारभार केला पण या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदेंची ही महत्त्वाकांक्षा वाढवून ठेवली, ती आता काट्याचा नायटा बनून महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार स्थापन होण्यातला अडथळा तर ठरत नाही ना??, असा संशय बळावत चालला आहे.
भाजपचे केंद्रीय नेतृत्व सर्व पातळ्यांवर बळकट असताना हे घडत असल्यामुळे संशयाच्या सोयीचे टोक अधिक धारदार आणि बोचरे बनले आहे. अन्यथा काँग्रेस जेव्हा केंद्रात सत्तेवर होती आणि त्यांचे केंद्रीय नेतृत्व तेवढेच बळकट होते, तेव्हा ते कुठल्याच प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची दादागिरी काँग्रेस नेत्यांनी कधी चालवून घेतल्याचे उदाहरण इतिहासात नमूद नाही.
महाराष्ट्रात महायुती बळकट करून आणि तिच्यात समन्वय आणि सत्ता संतुलन उत्तम राखून सरकार स्थापनेची अजूनही वेळ गेलेली नाही, पण त्यासाठी वाढवून ठेवलेली महत्त्वाकांक्षा आणि त्यातून काट्याचा नाटा नायटा बनत असण्याची शक्यता जर बळावर गेली, तर आत्ताच योग्य “ऑपरेशन” करणे किंवा अगदी “करेक्ट कार्यक्रम” करणे हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला भाग आहे.
– तोकड्या प्रादेशिक नेत्यांची नांगी ठेचा
अन्यथा महाराष्ट्रातला जनादेश कसाही येऊ द्यात, अगदी भाजपला बहुमताच्या काठावर नेऊन ठेऊ द्यात, केवळ मुत्सद्देगिरीच्या अभावी आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा “मॅनेज” करण्याच्या कौशल्याच्या अभावी भाजपचा कधी मुख्यमंत्री होत नाही, हा समज देशभर पसरायला वेळ लागणार नाही. त्यातून प्रादेशिक नेत्यांची दादागिरी तर वाढेलच, पण आपण कुठलेही राजकीय कर्तृत्व न दाखवता कितीही आमदार संख्या कमी किंवा जास्त आणली तरी भाजप सारख्या मोठ्या पक्षाला वाकवू शकतो, हा प्रादेशिक नेत्यांचा समज अधिक फुलण्याची शक्यता आहे. तो समज वेळीच नांगी ठेचून दूर करण्याची खरी आवश्यकता आहे. याबाबत मोदी – शाहांनी प्रणव मुखर्जींचा क्लास लावला होता, त्यातल्या अभ्यासाची उजळणी करण्यास हरकत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App