Nitesh Rane’s pre-arrest bail rejected : कोकणातील जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परबांवर झालेल्या हल्ला प्रकरणावरून नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नितेश राणे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे हा राणेंना मोठा धक्का असल्याचे मानलं जात आहे. सोमवारी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर मंगळवार, बुधवार अशी दोन दिवस युक्तिवाद झाले. यानंतर आजचा दिवस निकालासाठी राखून ठेवण्यात आला होता. परंतु, न्यायालयाने आज राणेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. Big news Nitesh Rane’s pre-arrest bail rejected, Rane shocked in Santosh Parab attack case
प्रतिनिधी
मुंबई : कोकणातील जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परबांवर झालेल्या हल्ला प्रकरणावरून नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नितेश राणे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे हा राणेंना मोठा धक्का असल्याचे मानलं जात आहे. सोमवारी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर मंगळवार, बुधवार अशी दोन दिवस युक्तिवाद झाले. यानंतर आजचा दिवस निकालासाठी राखून ठेवण्यात आला होता. परंतु, न्यायालयाने आज राणेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
दरम्यान, नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर कोर्टामध्ये युक्तिवाद झाले. भाजप आमदार नितेश राणे आणि सचिन सातपुते यांचे फोटो एकत्र असल्याचे पुरावे कोर्टासमोर वकील घरत यांनी दाखवले. यानंतर राणेंच्या वकिलांनी फोटो कुणासोबतही असला म्हणजे संबंध असतोच असे नाही, असेही राणेंच्या वकिलांनी म्हटले होते. आज न्यायालयाने निकाल देत राणेंनी पोलिसांना तपासात सहकार्य करावे असे म्हटले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्या जवळचे संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे. नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, एका सूडनाट्याचा अंत झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हापासून एखाद्या माध्यमिक शाळेत जसा संवाद होतो, तसाच वाद पाहायला मिळत आहे. राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, मात्र उच्च न्यायालयातही ते जाऊ शकतात. हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे.
दुसरीकडे, निकालानंतर सिंधुदुर्ग न्यायालयाबाहेर नितेश राणे यांचे वकील माध्यमांना म्हणाले की, आमच्याकडे हायकोर्टाकडे जाण्याचा पर्याय निश्चितच आहे. आम्ही ते करूच. आम्ही हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केल्यावर त्यावर सुनावणी होऊन निकाल येत नाही तोपर्यंत आम्हाला पोलिसांपासून बाजूला राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे.
Big news Nitesh Rane’s pre-arrest bail rejected, Rane shocked in Santosh Parab attack case
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App