वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने दिवाळीआधीच पेन्शनर्स आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. DA आणि DR 1 जुलैपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. Big gift to government employees before Diwali; 4% increase in inflation allowance
पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 % वाढ झाली आहे. 42 % वरुन 46 % महागाई भत्ता झाला आहे. केंद्र सरकारच्या विभागाने मेमोरँडम जारी केला आहे. त्यात कुठल्या पेंशनर्स महागाई भत्त्याचा लाभ मिळणार? आणि वाढलेला भत्त कधी मिळणार? त्या बद्दल माहिती देण्यात आली आहे.
DOPPW नुसार, सेंट्रल गर्व्हमेंटचे पेंशनर्स, फॅमिली पेंशनर्स, डिफेंस सेक्टरमधील आर्म फोर्सचे पेंशनर, सिविलियन पेंशनर, ऑल इंडिया सर्विस पेंशनर्स, रेल्वेचे पेंशनर, प्रोविजन पेंशनवाले आणि बर्मातून आलेल्या काही पेंशनर्सना DR मधल्या वाढीचा फायदा होणार आहे. त्याशिवाय न्याय विभागाच्या आदेशानुसार, रिटायर सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना देखील DR बेनिफिट मिळू शकतो.
किती वाढणार पेन्शन?
केंद्र सरकारने पेन्शनर्ससाठी DR मध्ये 4 % वाढ दिलीय. जर पेंशनर्सची बेसिक पेन्शन 40000 रुपये आहे, तर 42 % DR च्या हिशोबाने महागाई भत्ता 16000 पेक्षा जास्त होतो. नव्या वाढीनंतर बेसिक पेंशनमध्ये महागाई भत्ता 18000 पेक्षा जास्त असेल. म्हणजे पेन्शनर्सना दर महिन्याला 1000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळेल.
कधी मिळणार पैसे?
इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सरकारने बँकांना लवकरात लवकर पेन्शन जारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी कोणत्याही सूचनांची वाट पाहू नका. सरकारच्या घोषणेनंतर कुठल्याही क्षणी लोकांच्या खात्यात वाढीव रक्कम जमा होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App