Bhaskar Jadhav संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांची घायकुती; तरी सरकारने त्यांच्या इच्छेवर फेरले पाणी!!

Bhaskar Jadhav

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसतानाही भास्कर जाधवांची विरोधी पक्षनेते पदासाठी घायकुती; तरी सरकारने त्यांच्या इच्छेवर फेरले पाणी!!, असे चित्र आज विधानसभेत दिसले. Bhaskar Jadhav

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांच्या विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले. पण नार्वेकरांनी त्यावर अजून निर्णय घेतला नसल्याने भास्कर जाधव घायकुतीला आले. त्यांनी विधानसभेत भावनात्मक भाषण केले. तुम्हाला मला विरोधी पक्षनेते पद द्यायचे नसेल तर राहू द्या. मी माझे पत्र मागे घेतो. तुम्हाला हवे त्या नेत्याला विरोधी पक्षनेता करा, पण तुम्ही विरोधी पक्षनेता कुणाला तरी कराच.

विरोधी पक्षनेते पदाशिवाय विधानसभा ठेऊ नका, असे भास्कर जाधव म्हणाले. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या ज्येष्ठतेचाही देखील हवाला दिला. मी 1990 पासून आमदार म्हणून निवडून येतोय. मंत्रीपदावर काम केलेय. पण पदाची लालसा मी कधीच ठेवली नाही. पद म्हणजे माझा परमेश्वर नाही. माझ्या विरोधी पक्षनेते होण्याची तुम्हाला अडचण वाटत असेल, तर दुसऱ्या कोणाला विरोधी पक्षनेता करा. तसे पत्र मी माझ्या पक्षप्रमुखांकडून आणि महाविकास आघाडी कडून घेऊन तुम्हाला देतो, असेही भास्कर जाधव म्हणाले.

पण आज विधानसभा उपाध्यक्षांच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सूचक पद्धतीने भास्कर जाधव यांना उत्तर देऊन टाकले. विरोधी पक्षनेते पदा संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष जो निर्णय घेतील आणि जेव्हा निर्णय घेतील, तो सरकारला मान्य असेल. त्यामुळे त्यांचा निर्णय येईपर्यंत सध्या विरोधी पक्षनेते पद रिकामेच राहू द्या, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी विरोधकांच्या संख्याबळाचा उल्लेख केला नाही, पण तरी देखील मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे भास्कर जाधव यांच्या इच्छेवर विधानसभेच्या विद्यमान अधिवेशनात तरी पाणी फेरले गेले.

Bhaskar Jadhav letter to Assembly Speaker Rahul Narvekar for the post of Leader of Opposition

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub